BAN vs IND | टीम इंडियाचा 4 विकेट्सने पराभव, बांगलादेशची फायनलमध्ये धडक

| Updated on: Dec 15, 2023 | 7:35 PM

Bangladesh U19 vs India U19 2nd Semi Final | बांगलादेशने सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा 4 विकेट्सने पराभव करत अंडर 19 आशिया कप फायनलमध्ये धडक मारली आहे. आता हा अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

BAN vs IND | टीम इंडियाचा 4 विकेट्सने पराभव, बांगलादेशची फायनलमध्ये धडक
Follow us on

दुबई | बांगलादेश क्रिकेट टीमने अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बांगलादेशने दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियावर 4 विकेट्सने विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलंय. टीम इंडियाने बांगलादेशला विजयसाठी 189 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 42.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अरीफुल इस्लाम हा बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. तर अहरर अमीन यानेही विजयाच योगदान दिलं आता बांगलादेश विरुद्ध यूएई असा महाअंतिम सामना रंगणार आहे.

बांगलादेशकडून अरीफुल याने सर्वाधिक 94 धावांचं योगदान दिलं. अरीफुलने 90 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 90 धावांची निर्णायक खेळी केली. तर अहरर अमीन याने 101 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 44 धावांची चिवट खेळी केली. या दोघांशिवाय चौधरी एमडी रिझवान याने 13, मोहम्मद शिहाब जेम्स याने 9, आशिकुर रहमान शिबली याने 7 धावांचं योगदान दिलं. तर मोहम्मद शिहाब जेम्स आणि परवेज रहमान जिबोन हे दोघे नाबाद परतले. मोहम्मद शिहाब जेम्स 3 आणि परवेज रहमान जिबोन याने 2 धावा केल्या. टीम इंडियाकडून नमन तिवारी याने 3 आणि राज लिंबानी याने 2 विकेट्स घेतल्या.

त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र मुशीर खान आणि मुरुगन अभिषेक या दोघांनी अर्धशतकं करत टीम इंडियाला 150 पार पोहचवलं. या दोघांनी केलेल्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला 42.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 188 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून मुरुगन याने सर्वाधिक 62 रन्स केल्या. तर मुशीर खान याने 50 धावांचं योगदान दिलं. या दोघांशिवाय इतरांना काही विशेष करता आलं नाही.

बांगलादेश विजयी


बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | महफुजुर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी एमडी रिझवान, अरिफुल इस्लाम, मोहम्मद शिहाब जेम्स, अहरार अमीन, परवेझ रहमान जिबोन, रोहनत दौल्ला बोरसन, मोहम्मद इक्बाल हुसेन एमोन आणि मारुफ मृधा.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी आणि नमन तिवारी.