AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसाठी बांगलादेश संघ जाहीर, लिटन दास कॅप्टन, पहिला सामना केव्हा?

Bangladesh Sqaud For Asia Cup 2025 : बांगलादेश क्रिकेट टीम आशिया कप 2025 स्पर्धेत लिटन दास याच्या नेतृत्वात खेळणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी 22 ऑगस्टला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसाठी बांगलादेश संघ जाहीर, लिटन दास कॅप्टन, पहिला सामना केव्हा?
litton das ind vs ban t20iImage Credit source: Bcci
| Updated on: Aug 22, 2025 | 10:03 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आता एक एक करुन क्रिकेट बोर्डाकडून संघ जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. पीसीबीने सर्वात आधी संघ जाहीर केला. पीसीबीने आशिया कप स्पर्धेसाठी सलमान अली आगाह याला कर्णधार केलं. तसेच युवा खेळाडूंना संधी दिली. तसेच बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीला डच्चू दिला. त्यानंतर बीसीसीआयने 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव याच्याकडेच नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर शुबमन गिल याला कमबॅकसह अक्षर पटेल याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद देण्यात आलं. आता हाँगकाँगनंतर बांगलादेशने आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.

आशिया कप स्पर्धेसाठी बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डोने मुख्य संघात 15 खेळाडूंना स्थान दिलं आहे. तसेच खबरदारी म्हणून चौघांचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

नुरुल हसन याचं 3 वर्षांनंतर कमबॅक

बीसीबीने विकेटकीपर बॅट्समन नुरुल हसन याला संधी दिली आहे. नुरुलचं अशाप्रकारे टी 20i संघात जवळपास 3 वर्षानंतर कमबॅक झालं आहे. नुरुलने 6 नोव्हेंबर 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध अखेरचा टी 20i सामना खेळला होता.

पहिला सामना केव्हा?

दरम्यान बांगलादेश टीमचा या स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये बांगलादेश व्यतिरिक्त श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. बांगलादेश आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 11 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशसमोर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे श्रीलंका (13 सप्टेंबर) आणि अफगाणिस्तानचं (16 सप्टेंबर) आव्हान असणार आहे. बांगलादेशचे तिन्ही सामने हे अबुधाबीतच होणार आहेत.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बांगलादेश टीम : लिटन दास (कॅप्टन), तंझीद हसन, परवेज हुसैन इमोन, सैफ हसन, तॉहीद हृदोय, जाकेर अली, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्ताफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम आणि शैफुद्दीन.

राखीव खेळाडू : सौम्या सरकार, हसन महमूद, तनवीर इस्लाम आणि मेहदी हसन मिराज.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.