
सध्या भारतात आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा महासंग्राम सुरु आहे. स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तर 26 मे ला अंतिम सामना पार पडेल. त्यानतंर वेस्टइंडिज आणि यूएसएमध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कपला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडिया टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20 मालिका होणार आहे.
क्रिकेट विश्वात यंदा मेन्ससह वूमन्स टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. बांगलादेशमध्ये टी 20 वूमन्स वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या हिशोबाने वूमन्स टीम इंडियासाठी ही मालिका फायदेशीर आणि मदतशीर ठरेल.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया वूमन्स टी 20 सीरिजंच आयोजन हे 28 एप्रिल ते 9 मे दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 दिवसआधी 23 एप्रिल रोजी बांगलादेशला पोहचेल. तर 10 मे रोजी दौरा आटपून वूमन्स टीम भारतात परतेल.
पहिला सामना, 28 एप्रिल, रविवार
दुसरा सामना, 30 एप्रिल, मंगळवार
तिसरा सामना, 2 मे, गुरुवार
चौथा सामना, 6 मे, सोमवार
पाचवा सामना, 9 मे, गुरुवार
बांगलादेशकडून टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर
Bangladesh to host India for five T20Is as both teams aim to prepare for the ICC Women’s #T20WorldCup scheduled for later this year 👇https://t.co/6g1ZFZKywL
— ICC (@ICC) April 3, 2024
दरम्यान वूमन्स टीम इंडियाला गेल्या बांगलादेश दौऱ्यात मालिका जिंकता आली नाही. तेव्हा टीम इंडियाने मालिका बरोबरीत राखली. वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 13 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता या होम सीरिजमध्ये बांगलादेशचा कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.