BANW vs INDW 2nd Odi | टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 108 धावांनी धुव्वा, मालिका बरोबरीत

Bangladesh Women vs India Women 2nd ODI | टीम इंडियाच्या महिला मंडळने दुसऱ्या वनडेत अफलातून कामगिरी केली आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज्स हीन ऑलराउंड परफॉर्म करत विजयात निर्णायक भूमिका बजावली.

BANW vs INDW 2nd Odi | टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 108 धावांनी धुव्वा, मालिका बरोबरीत
| Updated on: Jul 19, 2023 | 4:48 PM

ढाका | टीम इंडिया वूमन्स क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश वूमन्सचा धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 108 धावांनी विजय मिळवलाय. टीम इंडियासाठी मालिकेच्या हिशोबाने हा ‘करो या मरो’ असा सामना होता. मात्र याच सामन्यात टीम इंडियाच्या महिला मंडळने धमाकेदार कामगिरी करत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 229 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा 120 रन्सवर डब्बा गूल झाला. टीम इंडियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसरा
आणि अंतिम सामना हा रंगतदार होणार आहे.

टीम इंडियाचा सुपर विजय

वूमन्स बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | मुर्शिदा खातून, शर्मीन अख्तर, फरगाना हक, निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), रितू मोनी, राबेया खान, लता मोंडल, नाहिदा अक्‍तर, फहिमा खातून, सुलताना खातून आणि मारुफा अक्‍टर.

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, देविका वैद्य आणि मेघना सिंग.