IND vs SL: केएल राहुलचं फलंदाजी करणं कठीण? पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मोठी अपडेट

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटा सामना गॉलमध्ये सुरू आहे. पहिल्या दिवशीचा खेळ भारतीय फलंदाजांनी गाजवला. पण केएल राहुल रिटायर्ड हर्ट झाल्याने क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. आता या पुढे फलंदाजी करणार की नाही? याबाबत बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी खुलासा केला आहे.

IND vs SL: केएल राहुलचं फलंदाजी करणं कठीण? पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मोठी अपडेट
IND vs SL: केएल राहुलचं फलंदाजी करणं कठीण? पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मोठी अपडेट
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 16, 2026 | 11:32 AM

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर स्पर्धेला मुकले. असं असताना सामना सुरू असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण मैदानात तग धरून उभा असलेला केएल राहुल रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची चिंता वाढली. त्यानंतर त्याच्या जागी गिल फलंदाजीला आला पण स्वस्तात बाद झाला. मग ऋषभ पंतने देवदत्त पडिक्कलसोबत डाव सावरला. असं असताना केएल राहुल फलंदाजीला येणार की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. यावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी मोठी अपडेट दिली आहे.

केएल राहुलला नेमकं काय झालं?

केएल राहुलने 162 चेंडूंचा सामना करून 77 धावांवर खेळून चांगला जम बसवला होता. आता शतकी खेळी करेल असं क्रीडाप्रेमींना आशा होत्या. पण अचानक क्रॅम्पमुळे त्रासलेला दिसला. वेदना असह्य झाल्यानंतर केएल राहुलने पंचांना याबाबत सांगितलं. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डिसिल्वा पुढे आला आणि त्याने केएल राहुलला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फरक पडला नाही. उलट क्रॅम्प वाढत गेला आणि वेदना असह्य होत गेल्या. डाव्या हाताच्या बोटापासून पायापर्यंत या वेदना पोहोचल्या. त्यामुळे केएल राहुलला मैदानात उभं राहणंही कठीण झालं. इतकंच काय तर त्याला चालताही येत नव्हतं. केएल राहुलची ही स्थिती पाहून टीम इंडियाच्या फिजिओनी मैदानात धाव घेतली. त्याची अवस्था पाहून त्याला फलंदाजी न करण्याच सल्ला दिला. तसाच फिजिओसोबत लंगडत बाहेर गेला.

केएल राहुल फलंदाजी करेल का?

केएल राहुल क्रॅम्प आणि वेदना असह्य झाल्याने मैदान सोडून गेला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 288 धावांवर 2 गडी गमावले होते. आता फलंदाजीला उतरणार का? असा प्रश्न आहे. यावर बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी सांगितलं की, केएल राहुल पूर्णपणे फिट आहे. तसेच फलंदाजाली उतरू शकतो. रेव्हस्पोर्टसच्या मते, दुसऱ्या दिवशी केएल राहुल फलंदाजीला उतरणार की नाही रे सर्वस्वी संघाच्या आवश्यकतेवर अवलंबून आहे. केएल राहुलच्या 77 धावा झाल्या असून शतकासाठी त्याला फक्त 23 धावांची गरज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us