
Brisbane Heat vs Melbourne Stars: बिग बॅश लीग स्पर्धेतील 20व्या सामन्यात ब्रिस्बेन हिट आणि मेलबर्न स्टार्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ब्रिस्बेन हिटने मेलबर्न स्टार्सला 4 विकेटने पराभूत केलं. गाबामध्ये खेळल्या गेल्या या सामन्यात मेलबर्नच्या संघाने 20 षटकात 195 धावा केल्या. हे लक्ष्य ब्रिस्बेन हिने 2 चेंडू राखून पूर्ण केलं. खरं तर हा सामना मेलबर्न स्टार्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण आठव्या क्रमांकावर उतरलेल्या झेव्हियरल बार्टलेटने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचं चित्र पालटून टाकलं. मॅक्स ब्रायंटसोबत 25 चेंडूत सामना मेलबर्न स्टार्सच्या घशातून खेचून आणला. ब्रिस्बेन हिटने 196 धावांचा पाठलाग करताना 16 व्या षटकात 133 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. ब्रिस्बेन हिटला 63 धावांची गरज होती आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला झेव्हियर बार्टलेट उतरला. या जोडीने 25 चेंडूत 66 केल्या.
बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिटच्या ब्रायंटने 17व्या षटकापासून आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली. स्वेप्सनच्या षटकात षटकार आणि चौकार मारला. त्यानंतर सामन्याचं रूपडं पालटू लागलं. या षटकात एकूण 16 धावा आल्या. 18व्या षटकात पीटर सिडल आणि त्याच्या षटकात 17 धावा आल्या. ब्रायंटने शेवटच्या तीन चेंडूवर 15 धावा काढल्या. 19व्या षटकात 17 धावा काढल्या. ब्रायंट आणि बार्टलेटने या षटकात चौकार आणि षटकार मारले. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. ब्रायंटने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूर षटकार आणि चौकार मारला आणि विजय मिळूवन दिला. मॅक्स ब्रायंटने 26 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. तर झेव्हियर बार्टलेटने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. पंजाब किंग्सने बार्टलेटला 80 लाखात रिटेन केलं आहे.
MAX BRYANT!
Can you believe it? The Brisbane Heat have won another thriller at The Gabba 🔥 #BBL15 pic.twitter.com/3ffcxaHAPs
— KFC Big Bash League (@BBL) January 2, 2026
मॅक्स ब्रायंट म्हणाला की, मला वाटतं शेवटच्या 4-5 षटकांत आमच्याकडे विकेट होत्या. तिथे राहण्यासाठी ही खूप छान जागा आहे. झेव्हियरने 16-17 व्या षटकात माझ्यावरील थोडासा दबाव कमी केला. त्याला श्रेय जाते. मला वाटते, बाहेर जाऊन प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करण्याची संधी दिली आणि आज रात्री यशस्वी झालो. आम्ही सामन्यापूर्वी म्हटले होते की, हे करो किंवा मरो असे आहे. आम्हाला गाब्बावर हरायचे नाही. आम्ही येथे 3 पैकी 3 आहोत आणि आशा आहे की, आम्ही अंतिम फेरीत प्रवेश करू. ते परिपूर्ण असेल. मला वाटते की आम्हाला दोन घरच्या मैदानावर जिंकण्याची गरज आहे.