BBL 2025-26: चौकार षटकार मारून ठोकल्या 80 धावा, शेवटच्या षटकात चूक झाली आणि नाबाद 99

बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या 16व्या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सचा कर्णधार एश्टन टर्नरचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. सहकारी खेळाडूच्या एका चुकीचा एश्टन टर्नरला फटका बसला.

BBL 2025-26: चौकार षटकार मारून ठोकल्या 80 धावा, शेवटच्या षटकात चूक झाली आणि नाबाद 99
BBL 2025-26: चौकार षटकार मारून ठोकल्या 80 धावा, शेवटच्या षटकात चूक झाली आणि नाबाद 99
Image Credit source: Jeremy Ng/Getty Images
| Updated on: Dec 30, 2025 | 6:21 PM

बिग बॅश लीग स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आणि त्याचा थरारही वाढत आहे. या स्पर्धेतील 16व्या सामन्यात सिडनी थंडर आणि पर्थ स्कॉर्चर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार एश्टन टर्नरने वादळी खेळी केली. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. 80 धावा तर त्याने चौकार आणि षटकार मारूनच केल्या. त्याच्या या खेळीमुळे संघाला 200 पार धावा करता आल्या. या सामन्यात कर्णधार एश्टन टर्नरची मोठी संधी हुकली. त्याचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. तर साथीदाराच्या एका चुकीमुळे त्याचं शतक चुकलं. एश्टन टर्नरने 41 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 8 षटकार मारले. पण शेवटच्या षटकात ड्रामा झाला आणि शतकासाठीची एक धाव करता आली नाही.

एश्टन टर्नरने शेवटच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारले. तिसर्‍या चेंडूवर एक धाव घेत नाबाद 99 धावांवर पोहोचला. चौथ्या चेंडूवर एश्टन एगर स्ट्राईकला होता. एगरने चौथ्या चेंडूवर चौकार मारला आणि पाचव्या चेंडूवर उत्तुंग शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण बाद झाला आणि एश्टन टर्नर नॉन स्ट्राईकला राहिला. एगरने तीन चेंडू शिल्लक असताना एक धाव काढली असती तर सहज टर्नरला शतक ठोकता आलं असतं. शेवटचा चेंडूचा सामना करणअयासाठी जोएल पेरीस आला पण तो देखील बाद होऊन तंबूत परतला. टर्नरला शेवटच्या तीन चेंडूत स्ट्राईकच मिळाली नाही. टर्नर नाबाद 99 धावांवर तंबूत परतला.

स्कॉर्चर्सने पॉवरप्लेमध्ये त्यांनी तीन विकेट गमावल्या. कूपर कॉनॉली आणि अ‍ॅश्टन टर्नरने चौथ्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी रचली. टर्नरने 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पर्थ स्कॉर्चर्सने 20 षटकात 8 गडी गमवून 202 धावा केल्या आणि विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं. सिडनी थंडर्सने या धावांचा पाठलाग करताना 131 धावांवरच नांगी टाकली. 17.3 षटकात सर्व गडी गमवून सिडनी थंडर्सने 131 धावा केल्या आणि हा सामना 71 धावांनी गमावला. एस्टन टर्नर या सामन्यात सामनावीराचा मानकरी ठरला.