Riyan Parag: रियान परागला टी20 वर्ल्डकप संघात मिळणार स्थान? बीसीसीआयकडून खास सूचना

रियान परागला दुखापत झाल्याने गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता. पण आता फिट अँड फाईन झाला आहे. बीसीसीआयने त्याला खास सूचना झाल्या. कारणही तसंच आहे. चला जाणून घ्या.

Riyan Parag: रियान परागला टी20 वर्ल्डकप संघात मिळणार स्थान? बीसीसीआयकडून खास सूचना
रियान परागला टी20 वर्ल्डकप संघात मिळणार स्थान? बीसीसीआयकडून खास सूचना
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 26, 2026 | 3:46 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका तीन सामन्यानंतर खिशात घातली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला असणार यात काही शंका नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अनफिट आहे. त्याच्या दुखापतीत सुधारणा होईल की नाही याबाबत साशंकता आहे. अशा स्थितीत अष्टपैलू रियान परागचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने सेंटर ऑफ एक्सीलेंसला रियान परागला सामन्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रियान परागने यो यो टेस्टही पास केली आहे. म्हणजेच त्याचा फिटनेसही चांगला आहे. त्यामुळे वॉशिंग्टनची दुखापत रियान परागच्या पथ्यावर पडेल असं दिसत आहे.

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात जखमी झाला होता. त्याच्या डाव्या बाजूच्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यामुळे वनडे आणि टी20 मालिकेला मुकला होता. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी फिट होण्याची शक्यता कमी आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावदी लागेल. त्यामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार्‍या टी20 वर्ल्डकपसाठी तयार राहणं कठीण जाणार आहे. त्यामुळे रियान परागला तयार राहण्यास सांगितलं आहे. येत्या दोन तीन दिवसात वॉशिंग्टन सुंदरबाबत निर्णय घेतला जाईल. त्याच्या बदल्यात प्रथम प्राधान्य रियान परागला दिलं जाण्याची शक्यता आहे.

रियान परागवर यशस्वी शस्त्रक्रिया

रियान पराग गेल्या तीन आठवड्यापूर्वी खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात परतण्यासाठी सीओईमध्ये सराव करत होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीला मुकला होता. आता रियान पराग व्यवस्थित असून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याला संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बळकटी मिळू शकते.