Asia Cup 2024 साठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिकची निवड, वसईच्या खेळाडूचा समावेश

Asia Cup 2024 Team India Sqaud : वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर साऱ्या क्रिकेट चाहत्यांना अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होते? याची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.

Asia Cup 2024 साठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिकची निवड, वसईच्या खेळाडूचा समावेश
Bcci
Image Credit source: Bcci
| Updated on: Nov 14, 2024 | 12:19 AM

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एकूण 15 खेळाडूंची निवड केली आहे. तर 5 राखीव खेळाडूंचा समावेश केला आहे. मोहम्मद अमन याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात असणार आहे. तर किरण चोरमले उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईकडून रणजी ट्रॉफीत द्विशतक करणाऱ्या वसईकर आयुष म्हात्रे याचाही या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक राज यालाही संधी मिळाली आहे.

अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार ए आणि बी ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान यूएई आहे. तर बी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेचा समावेश आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

प्रत्येक टीम साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा 26 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपासून टीम इंडिया या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना हा 2 तर तिसरा आणि अंतिम सामना 4 डिसेंबरला अनुक्रमे जपान आणि यूएईविरुद्ध होणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

भारत विरुद्ध पाकिस्तान, शनिवार 30 नोव्हेंबर, दुबई

भारत विरुद्ध जपान, सोमवार 2 डिसेंबर, शारजाह

भारत विरुद्ध यूएई, बुधवार 4 डिसेंबर, शारजाह

सेमी फायनल 1, शुक्रवार 6 डिसेंबर, दुबई

टीम इंडियाच्या सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता सुरुवात होणार आहे.

अंडर 19 आशिया कपसाठई असा आहे भारतीय संघ

अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया : मोहम्मद अमन (कॅप्टन), किरण चोरमले (उपकर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, प्रणव पंत, हरवंशसिंग पनगालिया (विकेटकीपर), अनुराग कवडे (विकेटकीपर), हार्दिक राज, एमडी ईनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा आणि निखिल कुमार.

नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व: साहिल पारख, नमन पुष्पक, अनमोलजीत सिंग, प्रणव राघवेंद्र आणि डी दिपेश.