AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंडिया-पाकिस्तान वनडे सामन्याची घोषणा, महामुकाबला केव्हा?

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान हे 2 कट्टर आणि चिर प्रतिद्वंदी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. जाणून घ्या हा बहुप्रतिक्षित सामना केव्हा होणार?

India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंडिया-पाकिस्तान वनडे सामन्याची घोषणा, महामुकाबला केव्हा?
india_vs_pakistan_flag
| Updated on: Nov 09, 2024 | 10:09 AM
Share

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान शेजारी पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तानला जाण्यासाठी विरोध आहे. आम्ही भारतीय खेळाडूंना पाकिस्तानला पाठवणार नाही, या भूमिकेवर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्ध करणार आहेत. हा सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार, टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि जपान ए ग्रुपमध्ये आहेत. तर बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ बी ग्रुपमध्ये आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा 29 नोव्हेंबरला होणार आहे. तर अंतिम सामना हा 8 डिसेंबरला पार पडणार आहे. तर त्याआधी 6 डिसेंबरला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने होणार आहेत.

बांगलादेश गेल्या वेळेस अंडर 19 आशिया कप स्पर्धेचा विजेता ठरला होता. तेव्हा भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला होता. तेव्हाही आणि आताही या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

भारताचे सामने आणि तारीख

भारत विरुद्ध पाकिस्तान, शनिवार 30 नोव्हेंबर, दुबई

भारत विरुद्ध जपान, सोमवार 2 डिसेंबर, शारजाह

भारत विरुद्ध यूएई, बुधवार 4 डिसेंबर, शारजाह

सेमी फायनल 1, शुक्रवार 6 डिसेंबर, दुबई

सेमी फायनल 2, शुक्रवार 6 डिसेंबर, शारजाह

फायनल, रविवार 8 डिसेंबर, दुबई

टीम इंडिया यशस्वी

अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याची ही यंदाची 11 वी वेळ आहे. टीम इंडिया या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरली आहे. टीम इंडिया 10 पैकी 8 वेळा आशिया चॅम्पियन ठरली आहे. भारताला 2023 आणि 2017 साली अपयश आलं होतं.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.