AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टी 20i वर्ल्ड कप जर्सीचं अनावरण होताच टीम इंडियाची घोषणा, बीसीसीआयकडून कुणाला संधी?

India vs South Africa T20i Series 2025 : बीसीसीआयने रायपूरमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आगामी टी 20i मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. जाणून घ्या कुणाला मिळाली संधी.

Team India : टी 20i वर्ल्ड कप जर्सीचं अनावरण होताच टीम इंडियाची घोषणा, बीसीसीआयकडून कुणाला संधी?
Team India Sqauad For T20i Series Against South AfricaImage Credit source: Bcci
| Updated on: Dec 03, 2025 | 6:51 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर उभयसंघात 9 डिसेंबरपासून टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच उपकर्णधार शुबमन गिल याचं मानेच्या दुखापतीनंतर भारतीय संघात कमबॅक झालं आहे. मात्र शुबमन खेळणार की नाही? हे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

बीसीसीआयने 3 डिसेंबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान टी 20i सीरिजसाठी सूर्यासेनेची घोषणा केली. त्याआधी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. यंदा भारतात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

हार्दिक पंड्याचं कमबॅक

टी 20i मालिकेतील 5 सामने हे 9 ते 19 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी टीममध्ये मॅचविनर आणि अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं 2 महिन्यानंतर कमबॅक झालं आहे. हार्दिकला टी 20i आशिया कप स्पर्धेदम्यान दुखापत झाली होती. मात्र हार्दिकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं. हार्दिकने त्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. तेव्हापासूनच हार्दिकचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. अखेर हार्दिक भारतीय संघात परतला आहे.

रिंकू-नितीश कुमार रेड्डीला डच्चू

निवड समितीने टी 20i मालिकेतून ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी आणि फिनिशर रिंकु सिंह या दोघांना डच्चू दिला आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 9 डिसेंबर, कटक

दुसरा सामना, 11 डिसेंबर, मुल्लानपूर

तिसरा सामना, 14 डिसेंबर, धर्मशाला

चौथा सामना, 17 डिसेंबर, लखनौ

पाचवा सामना, 19 डिसेंबर, अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ

टी 20I सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) (फिटनेसवर अवलंबून), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम