Team India : 1 मालिका-3 सामने, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
Womens India vs Australia Odi Series 2025 : भारतीय महिला संघ सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

बीसीसीआय निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा केली. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. त्यानंतर थोड्याच वेळात बीसीसीआय निवड समितीकडून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया या एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय संघात एकदिवसीय मालिकेसाठी कुणाला संधी मिळालीय? जाणून घेऊयात.
वूमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय वूमन्स निवड समिती प्रमुख नितू डेव्हिड याने भारतीय संघ जाहीर केला. नितू डेव्हिड आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या दोघींनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. डेव्हिड यांनी या दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी संधी देण्यात आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
स्मृती मंधाना उपकर्णधार
हरमनप्रीत कौर या एकदिवसीय मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 14 सप्टेंबर, मुल्लानपूर
दुसरा सामना, 17 सप्टेंबर, मुल्लानपूर
तिसरा सामना, 20 सप्टेंबर, नवी दिल्ली
इंग्लंड दौरा गाजवला
दरम्यान महिला ब्रिगेडने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात इतिहास रचला. भारताने या दौऱ्यातील टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत धमाका केला. भारताने टी 20i मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. तर त्यानंतर इंग्लंडचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत सलग दुसरी एकदिवसीय मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर) आणि स्नेह राणा.
