
आयपीएल स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरु असताना इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय आपले फासे टाकत आहे. इंग्लंड दौरा भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या मालिकेपासून टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीसाठी प्रवास सुरु होणार आहे. या मालिकेतील विजयी टक्केवारी भारतासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या गैरहजेरीत हा दौरा होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना चिंता लागून आहे. असं असताना इंडिया ए संघही तीन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन मैत्रिपूर्ण चार दिवसीय सामने खेळणार आहे. 30 मे पासून इंडिया ए संघ इंग्लंड लायन्स विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. या संघाची धुरा अभिमन्यू ईश्वरनच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी ध्रूव जुरेल पार पाडणार आहे. पहिला कसोटी सामना 30 मे ते 2 जून दरम्यान होणार आहे. कँन्टेबरी येथे हा सामना पार पडणार आहे.
दुसरा कसोटी सामना 6 जून ते 9 जून दरम्यान नॉर्थम्प्टनला होणार आहे. या सामन्यासाठी शुबमन गिल आणि साई सुदर्शन संघासोबत येणार आहेत. तर तिसरा कसोटी सामना भारतीय ए आणि भारत संघात होणार आहे. म्हणजेच दोन्ही भारतीय संघ सरावासाठी बेकेनहम भिडणार आहे. हा सामना 13 जून ते 16 जून दरम्यान होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 22 जूनपासून सुरु होणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा 23 मे रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंडिया ए संघात करूण नायर आणि इशान किशनची निवड झाली आहे. या दोघांची प्रदीर्घ कालानंतर संघात निवड झाली आहे. त्यामुळे या दोघांना वरिष्ठ संघात संधी मिळू शकते.
इंडिया ए संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, हर्षित राणा, तुषार देशपांडे, हर्ष दुबे.