AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci Announced Team India vs Sri Lanka : BCCI कडून टीम इंडियाची श्रीलंकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी घोषणा, गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय

BCCI Announced team india against Sri Lanka : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठ टीम इंडियाची घोषणा केली आहे. गौतम गंभीर याने मोठा निर्णय घेतला असून कॅप्टनपदाची माळ सूर्यकुमार यादव याच्या गळ्यात घातली आहे. केकेआरच्या एका खेळाडूची थेट वन डे टीमध्ये निवड झाली आहे. कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.

Bcci Announced Team India vs Sri Lanka : BCCI कडून टीम इंडियाची श्रीलंकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी घोषणा, गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Jul 18, 2024 | 8:25 PM
Share

बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रीलंकेविरूद्ध टीम इंडिया तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. गौतम गंभीरचा कोच म्हणून पहिला दौरा असून या दौऱ्यामध्ये टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याची कॅप्टन म्हणून निवड केली गेलीये. शुबमन गिल याच्याकडून कॅप्टनपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. हार्दिक पंड्या याच्या नावाची अधिक चर्चा होती पण गौतम गंभीर आणि निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडे जबाबदारी दिली आहे. टी-20 संघातून रुतुराज गायकवाड याला स्थान मिळालं नाही. टी-20 मालिका 27 जुलै ते 30 जुलै आणि एकदिवसीय मालिका 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रेक घेतल्याच्या बातम्यांनीही पूर्णविराम लागला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी विराटचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याकडून उपकर्णधारपद काढून ते शुबमन गिलला मिळालं आहे. शुबमन गिल वनडे आणि टी-20 चा उपकर्णधारपद असणार आहे.

श्रेयस अय्यरचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. अय्यरला काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते, मात्र आता तो वनडे खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वनडे संघात हर्षित राणाच्या नावाचाही समावेश आहे. या मालिकेत त्याला भारताकडून पदार्पणाची संधी मिळू शकते.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: (India ODI Squad against Sri Lanka)

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ : (India T20I and Squad against Sri Lanka)

सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), जैस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.