Odi Series : 15 खेळाडू, 3 सामने आणि 1 मालिका, बीसीसीआयकडून संघ जाहीर, कुणाला संधी?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मायदेशातील एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. जाणून घ्या वेळापत्रक आणि ठिकाण.

Odi Series : 15 खेळाडू, 3 सामने आणि 1 मालिका, बीसीसीआयकडून संघ जाहीर, कुणाला संधी?
Niranjan Shah Stadium in Rajkot
Image Credit source: Saurashtra Cricket Association X handle
| Updated on: Jan 06, 2025 | 3:03 PM

भारतीय महिला संघाची आयर्लंड विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. स्मृती मानधना ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दीप्ती शर्मा हीच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग ठाकुर या दोघींना विश्रांती देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहेत. तसचे मराठमोळ्या सायली सातघरे हीती निवडक करण्यात आली आहे.

उभयसंघातील मालिकेला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 12 तारखेला दुसरा तर 15 जानेवारीला तिसरा आणि अंतिम सामना पार पडणार आहे. हे तिन्ही सामने एकाच मैदानात होणार आहेत. सर्व सामने निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

मुंबईकर ऑलराउंडर सायली सातघरे हीचा समावेश करण्यात आला आहे. सायली सातघरेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया ए संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच सायली सातघरे हीच्या राघवी बिष्ट या दोघींना एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

वनडे सीरिजचं शेड्यूल

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, पहिला सामना, शुक्रवार 10 जानेवारी, सकाळी 11 वाजता

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, दुसरा सामना, रविवार 12 जानेवारी, सकाळी 11 वाजता

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, तिसरा सामना, बुधवार 15 जानेवारी, सकाळी 11 वाजता

स्मृतीकडे भारतीय संघाचं नेतृत्व

एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंड महिला संघ : गॅबी लुईस (कॅप्टन), एवा कॅनिंग, क्रिस्टीना कूल्टर रीली, अलाना डाल्जेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉगरन, एमी मॅगुइरे, लिआ पॉल, ओरला प्रेंडरगॅस्ट, ऊना रेमंड-होए, फ्रेया सार्जेंट आणि रेबेका स्टोकेल.

आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.