AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहितसेनेची घोषणा, बुमराहबाबत मोठा निर्णय

Team India Squad For Odi Series Against England 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात निर्णायक एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहितसेनेची घोषणा, बुमराहबाबत मोठा निर्णय
team india bumrah virat rohitImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 18, 2025 | 4:07 PM
Share

टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समिती 12 जानेवारीला5 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानतंर आत शनिवारी 18 जानेवारीला निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहितसेनेची घोषणा केली आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध या वनडे सीरिजमध्ये एकूण 3 सामने खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे.

निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच अजित आगरकर यांनी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट दिली आहे. बुमराह या मालिकेत खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर आधारित असणार आहे. मात्र जर बुमराहला खेळता आलं नाही, तर त्याच्या जागी हर्षित राणा याचा समावेश केला जाईल, असं आगरकर यांनी स्पष्ट केलं. हर्षितचा एकदिवसीय मालिकेत बुमराहचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला आहे.

बुमराहला दुखापत

जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात दुखापत झाली होती. सिडनीत पाचवा सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा बुमराहला पाठीचा त्रास जाणवला. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नाही.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, गुरुवार 6 फेब्रुवारी, नागपूर

दुसरा सामना, रविवार 9 फेब्रुवारी, कटक

तिसरा सामना, बुधवार 12 फेब्रुवारी, अहमदाबाद

वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).

भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.