
टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर अनेक नवख्या खेळाडूंना या दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या झिंबाब्वे दौऱ्यात एकूण 5 टी 20 सामने खेळणार आहे. हे पाचही सामने हरारे स्पोर्स्ट क्लब स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांना संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा 7 जुलैला होणार आहे. तर 14 जुलैला मालिकेची सांगता होणार आहे.
निवड समितीने या टी 20 मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली आहे. विशेष करुन नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तुषार देशपांडे (सीएसके), रियान पराग (राजस्थान रॉयल्स), अभिषेक शर्मा (एसआरएच) आणि नितीश रेड्डी या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांचा समावेश केला गेला आहे.
दरम्यान या टी 20 मालिकेत शुबमन गिल भारतीय संघांचं नेतृत्व करणार आहे. कॅप्टन्सीसाठी ऋतुराज गायकवाड याचं नावही चर्चेत होतं. मात्र निवड समितीने शुबमनवर विश्वास दाखवला आहे. शुबमनची टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत राखील खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.
झिंबाब्वे विरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर
🚨 NEWS
India’s squad for tour of Zimbabwe announced.#TeamIndia | #ZIMvIND
— BCCI (@BCCI) June 24, 2024
पहिला सामना, 6 जुलै
दुसरा सामना, 7 जुलै
तिसरा सामना, 10 जुलै
चौथा सामना, 13 जुलै
पाचवा सामना, 14 जुलै.
झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.