AUS vs IND : इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया दौरा, 5 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी, कर्णधार कोण?

India U19 squad for Australia tour : बीसीसीआय निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 19 वर्षांखालील भारतीय संघाची घोषणा केली आहे. पाहा कुणाला मिळाली संधी.

AUS vs IND : इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया दौरा, 5 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी, कर्णधार कोण?
AUS vs IND
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jul 30, 2025 | 10:57 PM

सिनीअर टीम इंडिया सध्या शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तर अंतिम सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या पाचव्या सामन्याआधी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अंडर 19 भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

अंडर 19 टीम इंडियाने युवा आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात 27 जून ते 23 जुलैदरम्यान इंग्लंड दौरा केला. अंडर 19 टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 मॅचची यूथ वनडे सीरिज 3-2 ने जिंकली. त्यानंतर उभयसंघातील 4 दिवसांचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले. त्यानंतर आता अंडर 19 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने 17 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. त्यानुसार मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्याकडे या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विहान मल्होत्रा हा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. अभिज्ञान कुंडु आणि हरविंश सिंह या दोघांना विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आलीय.

तसेच वैभव सूर्यवंशी याचा देखील समावेश करण्यात आला आहे. वैभवने इंग्लंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यामुळे वैभव ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे. तसेच निवड समितीने मुख्य संघाव्यतिरिक्त 5 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार 21 सप्टेंबर, नॉर्थ्स

दुसरा सामना, बुधवार 24 सप्टेंबर, नॉर्थ्स

तिसरा सामना, शुक्रवार 26 सप्टेंबर, नॉर्थ्स

मल्टी डे मॅच

पहिला सामना, 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, नॉर्थ्स

दुसरा आणि अंतिम सामना, 7 ते 10 ऑक्टोबर, मॅकाय

अंडर 19 टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडिया : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर एस अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी दीपेश, किशन कुमार, अनमोलजीत सिंग, खिलन पटेल, उद्धव मोहन आणि अमन चौहान.

राखीव खेळाडू : युद्धजित गुहा, लक्ष्मण, बी.के. किशोर, अलंकृत रापोळे आणि अर्णव बुग्गा.