AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

Indian Womens Cricket Team T20I World Cup 2026 : बीसीसीआय वुमन्सकडून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या कुणाला मिळाली संधी.

Team India : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
Womens T20I World Cup TrophyImage Credit source: Scott Barbour/Getty Images
| Updated on: May 02, 2026 | 9:02 PM
Share

आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेचा 12 जूनपासून थरार रंगणार आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी बीसीसीआयने शनिवारी 2 मे रोजी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

कुणाला डच्चू?

वुमन्स टीम इंडियाने काही महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. टीम इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. निवड समितीने या टी 20i वर्ल्ड कपसाठी गेल्या स्पर्धेतील अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र फॉर्मेट वेगळा असल्याने काही खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. यामध्ये वनडे टीममधील ओपनर प्रतिका रावल हीला संधी देण्यात आलेली नाही. तसेच ऑलराउंडर स्नेह राणा, अमनजोत कौर आणि हर्लीन देओल यांनाही स्थान मिळालेलं नाही.

यास्तिका भाटीयाचं कमबॅक

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघा युवा विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटीया हीचं कमबॅक झालं आहे. यास्तिकाचं तब्बल 2 वर्षांनी कमबॅक झालं आहे.

दरम्यान या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 12 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. इंग्लंडकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेत 12 जून ते 5 जुलै दरम्यान एकूण 33 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही 14 जूनपासून होणार आहे. टीम इंडियासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असणार आहे.

टीम इंडियाचं वेळापत्रक

पहिला सामना, विरुद्ध पाकिस्तान, 14 जून, एड्जबस्टन.

दुसरा सामना, विरुद्ध नेदरलँड्स, 17 जून, हेडिंग्ले.

तिसरा सामना, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 21 जून, मँचेस्टर.

चौथा सामना, विरुद्ध बांगलादेश, 25 जून, मँचेस्टर.

पाचवा सामना, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 28 जून, लॉर्ड्स.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!