IPL 2022: चार वर्षानंतर BCCI ने आयपीएलच्या Closing Ceremony बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय

IPL 2022: BCCI ने तब्बल चार वर्षानंतर आयपीएलची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी (Closing Ceremony) आयोजित करण्यात आली नव्हती.

IPL 2022: चार वर्षानंतर BCCI ने आयपीएलच्या Closing Ceremony बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय
आयपीएल प्लेऑफ सामने Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 5:25 PM

मुंबई: BCCI ने तब्बल चार वर्षानंतर आयपीएलची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी (Closing Ceremony) आयोजित करण्यात आली नव्हती. यावेळी भारतीय क्रिकेट बोर्डाने फॅन्ससाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) ची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. बीसीसीआय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम सोपवणार असून त्यासाठी टेंडरही जारी केलं आहे. टेंडरसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल आयपीएलच्या साईटवर टाकण्यात आलीय. कुठलीही कंपनी एक लाख रुपये भरून टेंडर मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. भरलेली रक्कम परत मिळणार नाही, असंही या टेंडरमध्ये म्हटलं आहे.

अखेर चौथ्यावर्षी होणार क्लोजिंग सेरेमनी

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मुलाखतीत क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचे संकेत दिले होते. कोरोनामुळे मागच्या तीन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. यापूर्वी वर्ष 2018 मध्ये क्लोजिंग सेरेमनी झाली होती.

कुठे होणार क्लोजिंग सेरेमनी?

IPL 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. तिथेच क्लोजिंग सेरेमनीचा कार्यक्रम होईल. BCCI ने या प्लानच्या अमलबजावणीवर काम सुरु केलं आहे. आयपीएल 2018 पासून क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. 2019 मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे क्लोजिंग सेरेमनी टाळण्यात आली होती. 2020 मध्ये कोरोनाला सुरुवात झाली. तेव्हापासून ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. आता कोरोनाचा वेग भरपूर मंदावलाय. त्यामुळे BCCI ने क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.