
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठे निर्णय झाले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली आहे. राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. देवजीत सैकिया सचिव, ए. रघुराम भट्ट कोषाध्यक्ष आणि प्रभतेज सिंग भाटिया संयुक्त सचिव झाले.दुसरीकडे, बीसीसीआने या बैठकीत दोन नव्या सिलेक्टर्सची घोषणआ केली आहे. एस शरत आणि सुब्रतो बॅनर्जी यांच्या जागी दोन दिग्गज माजी खेळाडूंची निवड केली आहे. आता अजित आगरकरला संघ निवडीत प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंह मदत करणार आहेत. बीसीसीआयने पुरुष संघाच्या निवडीसाठी दोन नव्या सिलेक्टर्सची निवड केली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता या दोघांची निवड झाली आहे. दरम्यान या शर्यतीत माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याचंही नाव होतं. पण त्याची संधी हुकली आहे. दुसरीकडे, दिल्लीच्या अमिता शर्माची महिला निवड समितीत निवड झाली आहे.
ईस्ट झोनमधून प्रज्ञान ओझा सिलेक्टर म्हणून निवड झाली आहे. त्याने भारतासाठी 24 कसोटी, 18 वनडे आणि 6 टी20 सामने खेळला आहे. ओझाला 108 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव आहे. त्याने 424 विकेट्स घेतल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये 123 विकेट्स आहेत. त्याच्याकडे टी20 मध्ये 156 विकेट्स आहेत. तर माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आरपी सिंहने भारतासाठी 14 कसोटी खेळला असून 40 विकेट घेतल्या आहेत. तर वनडेत त्याने 58 सामन्यात 69 विकेट, तर टी20 सामन्यातील 10 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहे. आरपी सिंहने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बराच काळ खेळला. त्याने 94 फर्स्ट क्लास क्रिकेट 301 विकेट घेतल्या. तर लिस्ट ए मध्ये त्याने 190 आणि टी20 मध्ये 146 विकेट घेतल्या आहेत.
🚨 RP SINGH & PRAGYAN OJHA APPOINTED AS TWO NEW SELECTORS OF INDIA 🚨 pic.twitter.com/eXtIWEcPMJ
— Tanuj (@ImTanujSingh) September 28, 2025
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बीसीसीआये निवड समितीत दोन जणांच्या निवड करण्यासोबत खेळाडू निवडीचे निकष देखील लावले आहेत. 16 वर्षाखाली खेळाडू फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला नसेल तर त्याला आयपीएलमध्ये भाग घेता येणार नाही. यामुळे खेळाडूंना रणजी स्पर्धेत भाग घेणं अनिवार्य होणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या क्रिकेट कौशल्यात सुधारणा होईल असं जाणकार सांगत आहेत.