BCCI Asia Cup Review : बीसीसीआयची आढावा बैठक, अनेक मुद्द्यांवर चर्चा, जाणून घ्या….

| Updated on: Sep 13, 2022 | 10:02 PM

बीसीसीआयच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी टी-20 विश्वचषकावरही चर्चा झाली.

BCCI Asia Cup Review : बीसीसीआयची आढावा बैठक, अनेक मुद्द्यांवर चर्चा, जाणून घ्या....
बीसीसीआयचं टेन्शन वाढलं
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 world cup) अचानक टीम इंडियानं बीसीसीआयचं (BCCI) टेन्शन कसं वाढलं आहे, हे कळायला मार्ग नाही. नुकतीच टीम इंडियाची निवड झाली आहे. यात अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर काही खेळाडूंचं नाव अनपेक्षितपणे समोर आलंय. मात्र, सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या आशिया कपविषयीच्या बैठकीत (BCCI Asia Cup Review) असे कोणते मुद्दे उपस्थितीत करण्यात आले. त्यावर काय चर्चा झाली, कोणते विश्वय बीसीसीआयला तापदायक वाटतायत. याविषयी अधिक जाणून घ्या…

संथ फलंदाजी

आशिया कपमध्ये भारताची कामगिरी खराब होती. ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानी राहिल्यानंतर सुपर फोरमध्ये दोन सामने गमावल्यानंतर संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. बीसीसीआयनं या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबाबत बैठक घेतली. मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजी हा चिंतेचा विषय बनला आहे.

बीसीसीआयचं मत काय?

बीसीसीआयच्या बैठकीतील चर्चेनुसार सूत्रांनी असं सांगितलंय की, ‘7 ते 15 षटकांदरम्यान भारतीय फलंदाजी अतिशय संथ असते आणि हीच एकमेव समस्या असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. आगामी T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची कामगिरी सुधारणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यंदा 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे.

संघाची घोषणा, मग टेन्शन काय?

बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यासोबतच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली. 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होत आहे. यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांनी आशिया कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीबाबत राष्ट्रीय निवड समितीशी चर्चा केली.