Asia cup 2022: दीपक चाहर की आणखी कोण? अखेर BCCI ला यावर मौन सोडावच लागलं

झिम्बाब्वे दौऱ्यात दीपक चाहरने यशस्वी कमबॅक केलं. त्याने पहिल्या सामन्यात तीन विकेट काढल्या. दुसऱ्यासामन्यात तो खेळला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

Asia cup 2022: दीपक चाहर की आणखी कोण? अखेर BCCI ला यावर मौन सोडावच लागलं
Deepak chahar
Image Credit source: instagram
| Updated on: Aug 25, 2022 | 5:57 PM

मुंबई: दीपक चाहरला (Deepak chahar) दुखापत झाली असून त्याच्याजागी कुलदीप सेनचा (Kuldeep sen) आशिया चषकासाठी (Asia cup) निवडण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आलाय, अशी चर्चा आज सकाळपासून सुरु होती. या चर्चेने जोर धरला होता. त्यावर अखेर आता BCCI ने स्पष्टीकण दिलं आहे. दीपक चाहरला दुखापत झालेली नाही. तो संघासोबतच आहे. कुलदीप सेनला नेट गोलंदाज म्हणून बोलवण्यात आलय, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. चहरला दुखापत झाल्याची बातमी वेगाने पसरली. पण वास्तवात चाहरला दुखापत झालेली नाही, असं इनसाइडस्पोर्ट्ने वृत्त दिलं आहे. दीपक चाहर दुबई मध्ये असून तो स्टँड बाय गोलंदाज म्हणून संघासोबत असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलय.

कुलदीप नेट बॉलर म्हणून दाखल

“हा निव्वळ मूर्खपणा आहे. तो दुबईत संघासोबत आहे. तो काल प्रॅक्टिस मध्ये सहभागी झाला होता. आजही सराव सत्रात सहभागी होईल. तो पूर्णपणे ओके आहे. कुलदीप नेट बॉलर म्हणून दाखल झालाय. त्याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे. पण तो पूर्णवेळ पर्याय नाहीय” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्ला सांगितलं.

दीपक चाहरचं यशस्वी कमबॅक

झिम्बाब्वे दौऱ्यात दीपक चाहरने यशस्वी कमबॅक केलं. त्याने पहिल्या सामन्यात तीन विकेट काढल्या. दुसऱ्यासामन्यात तो खेळला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण तिसऱ्या वनडेत तो खेळला. मुख्य संघात त्याचा समावेश करण्याबद्दल चर्चा आहे. दीपक चाहर दुखापतीमधून पुनरागमन करत असल्याने चाहरच्या जागी निवड समितीने आवेश खानला प्राधान्य दिलं.

कोण आहे कुलदीप सेन?

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी कुलदीप सेनने दमदार कामगिरी केली. त्यानंतर कुलदीप सेन चर्चेत आला. कुलदीप मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील हरीहरपूरचा रहिवाशी आहे. वडिल रामपाल सेन यांचं छोटसं सलून आहे. पाच भावंडांमध्ये कुलदीप तिसरा. वयाच्या आठव्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेट अकादमीतही त्याची फी माफ करण्यात आली, जेणेकरुन त्याचं क्रिकेट करीयर थांबणार नाही.