IPL संघ मालक नाराज, BCCI चा चुकीचा, तर्कहीन निर्णय सलतोय

| Updated on: Aug 15, 2022 | 11:49 AM

इंडियन प्रीमियर लीगला पाहून वेगवेगळ्या देशात क्रिकेट लीग स्पर्धा सुरु होत आहेत. आयपीएल सारखं यश दुसऱ्या लीगला मिळण्याची शक्यता कमीच आहे. याची अनेक कारणं आहेत.

IPL संघ मालक नाराज, BCCI चा चुकीचा, तर्कहीन निर्णय सलतोय
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगला पाहून वेगवेगळ्या देशात क्रिकेट लीग स्पर्धा सुरु होत आहेत. आयपीएल सारखं यश दुसऱ्या लीगला मिळण्याची शक्यता कमीच आहे. याची अनेक कारणं आहेत. मात्र बीसीसीआयचा एक निर्णय, या सर्व लीग्सला लोकप्रियता आणि भरघोस उत्पन्न मिळवण्यापासून रोखणारा आहे. भारतीय खेळाडूंना या लीग मध्ये खेळण्याची परवानगी नाहीय. याच निर्णयाचा अन्य लीग क्रिकेट स्पर्धांना फटका बसणार आहे. जगातील दिग्गज क्रिकेटपटू आयपीएल मध्ये खेळतात. पण भारतीय क्रिकेटपटू अन्य लीग मध्ये खेळत नाहीत. BCCI चा हाच निर्णय आता IPL फ्रेंचायजींना त्रासदायक ठरतोय.

आयपीएल फ्रेंचायजींनी सुरु केला विस्तार

मागच्या 15 वर्षात आयपीएल मध्ये मिळालेलं यश लक्षात घेऊन आयपीएल फ्रेंचायजींनी आता विस्तार सुरु केला आहे. दुसऱ्या लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये गुंतवणूक सुरु केली आहे. कॅरेबियाई प्रीमियर लीग मध्ये मागच्या 3-4 वर्षांपासून हे सुरु आहे. आयपीएल फ्रेंचायजींनी आता दक्षिण आफ्रिकेत सुरु होणाऱ्या टी 20 लीग आणि UAE लीग मध्ये गुंतवणूक केली आहे. आयपीएल मध्ये खेळणारे खेळाडू किंवा कोचिंगचा भाग असलेल्या खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळावी, अशी आयपीएल फ्रेंचायजींची अपेक्षा होती. पण BCCI ने परवानगी नाकारली आहे.

हा चुकीचा निर्णय

CSA T 20 लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्सन संघ विकत घेतला आहे. आपल्या फ्रेंचायजीसाठी चेन्नईला IPL मधील CSK चा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर म्हणून घेऊन जायचं आहे. पण बीसीसीआयने परवानगी नाकारली आहे. यासाठी धोनीला आयपीएल मधूनही सन्यास घ्यावा लागेल. भारतीय बोर्डाची ही भूमिका आता फ्रेंचायजी मालकांना पटत नाहीय.

फ्रेंचायजी अधिकाऱ्याने काय सांगितलं?

“बीसीसीआय कडून आम्ही अधिकृत उत्तराची वाट पाहतोय. आम्हाला जी काही माहिती मिळालीय, ती मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून मिळाली आहे. हे खरं असेल, तर बीसीसीआयची भूमिका चुकीची आहे” एका फ्रेंचायजी अधिकाऱ्याच्या हवाल्याने इनसाइडस्पोर्ट अधिकाऱ्याने हे वृत्त दिलय.

आम्ही आमचा सपोर्ट स्टाफ आणि इकोसिस्टमचा परदेशी योजनांमध्ये उपयोग करु शकतो. बीसीसीआयने आम्हाला रोखलं, तर हे योग्य पाऊल नसेल.