PHOTO: अंतिम लढतीसाठी भारताचे शिलेदार तयार, इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये सराव करताना भारतीय संघ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. पाचवा आणि अखेरचा सामना 10 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 8:21 PM
1 / 5
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिका अगदी रंगतदार स्थितीत आली आहे. भारत या मालिकेत अद्याप विजयी झाला नसला तरी भारताला मालिका पराभूत करणेही इंग्लंडला आता शक्य नाही. पाच कसोटी सामन्यांमध्ये चार सामन्यानंतर भारत 2-1 च्या आघाडीवर असल्याने अखेरचा सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. दुसरीकडे इंग्लंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत राहिल, तसेच सामना अनिर्णीत झाल्यासही भारतच मालिका जिंकेल. त्यामुळे भारतासाठी ही मालिका चांगली ठरली आहे. मात्र पाचव्या सामन्यात विजयच मिळवायचा असल्याने भारत संपूर्ण तयारी करत आहे. बीसीसीआयने देखील खेळाडूचे सराव करतानाचे  फोटो शेअर केल आहेत.

2 / 5
भारतीय संघ पाचवा कसोटी सामना खेळवला जाणाऱ्या मँचेस्टेर येथील ओल्ड ट्रेडफोर्ड (Old Trafford Cricket Stadium) मैदानात पोहोचला असून तेथे सराव करत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचं व्हिंटेज स्वेटर घालून सराव करातना आढळला.

3 / 5
पहिल्या काही सामन्यात खराब प्रदर्शनानंतर ऐन रंगात आलेला भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) थ्रोची प्रॅक्टीस करताना वरील फोटोत दिसत आहे. त्याने मालिके दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

4 / 5
पहिले दोन सामने तंबूत बसलेला उमेश यादव (Umesh Yadav) चौैथ्या सामन्यात आला आणि त्याने पहिलाच विकेट जो रुटचा घेतला. त्यानंतर दोन्ही डावात उत्तम गोलंदाजी करत पाचव्या कसोटीसाठी आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.

5 / 5
अगदी पहिल्या कसोटीपासून भारताचा नंबर 1 फिरकीपटू आर. आश्विन (R Ashwin) सामना खेळण्याची वाट पाहत आहे. पण अद्याप त्याला संधी देण्यात आली नसून पाचव्या सामन्यात तरी त्याला संधी मिळते का? हे पाहावं लागेल.