Presented By
कोलंबो : भारतीय युवा क्रिकेटपटू सध्या नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्त्वाखाली सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी संपूर्ण भारतीय संघ सराव करत आहे. सर्व युवा खेळाडू दिवस-रात्र जीममध्ये घाम गाळत आहेत. दरम्यान भारताचे महत्त्वाचे अष्टपैलू खेळाडू असणारे पांड्या बंधूही कसून सराव करत आहेत. हार्दीक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) या दोघांनी जीममध्ये एक हटके चँलेज केले त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला असून या व्हिडीओवर क्रिकेटफॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (BCCI Shares Video of Hardik and krunal Pandya Doing Quick Gym Challenge)
व्हिडीओमध्ये कृणाल आणि हार्दीक हे दोघेही क्यूक जीम चँलेज करत आहेत. ज्यात काही अवघड अशा जीममधील आसनांमध्ये दोघे भाऊ दिसत असून कोण अधिक काळ सराव करतो अशीच जणू त्याच्यांत चुरस लागून आहे. बीसीसीआयने या व्हिडीओला ‘हे दिसताना सोपे दिसत असले तरी करायला अवघड आहे आणि घरी करणार असल्यास काळजी घ्या’ असे कॅप्शन दिले आहे.
This may look easy, but it’s NOT! ❌
Care to try one of these challenges at home? 🏠
The Pandya brothers – @hardikpandya7 & @krunalpandya24 – face off in a quick gym challenge 😎 👌 – by @28anand & @ameyatilak #TeamIndia #SLvIND
Full video 🎥 👇https://t.co/vQvehckl8X pic.twitter.com/XYeIsLPkt1
— BCCI (@BCCI) July 11, 2021
मागील काही दिवसांपासून हार्दीक पांड्या आपल्या धडाकेबाज फॉर्ममध्ये नसल्याने तो वरीष्ठ संघातून बाहेर आहे. त्यामुळे आता श्रीलंका दौैऱ्यात तो दमदार पुनरागमन करुन टी-20 विश्वचषकाच्या संघात जागा मिळवणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे कृणाल पांड्याही गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही ठिकाणी संघासाठी योगदान देऊ शकल्यास त्याचीही विश्वचषकाच्या संघात वर्णी लागू शकते. हार्दीक वेगवान गोलंदाजीसह फलंदाजी करतो. तर कृणाल फिरकी गोलंदाजीसह फलंदाजी करतो. दोघे भाऊही अष्टपैलू असल्याने अशाच खेळाडूंची भारतीय संघात अधिक गरज आहे.
श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला खेळवला जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला यावेळी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यां दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
नवे वेळापत्रक
हे ही वाचा :
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज विचारतोय कोणता बॉलीवुड चित्रपट पाहू?, पोस्टवर लाखो लाईक्ससह हजारो कमेंट्स
(BCCI Shares Video of Hardik and krunal Pandya Doing Quick Gym Challenge)