सिडनी : इंडियन प्रिमीयर लीगमुळे अनेक परदेशी खेळाडूंचे भारतासी फार मैत्रीपूर्ण आणि घट्ट नाते जमले आहे. अनेक खेळाडूंना तर भारतातूनच खूप प्रेम मिळते. ज्यात न्यूझीलंडचा केन विल्यमसन, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स, वेस्ट इंडिजचा केईरॉन पोलार्ड अशा खेळाडूंची नावे आहेत. ज्याप्रकारे भारतीय या क्रिकेटप्रेमींवर प्रेम करतात या खेळाडूंसह अनेक खेळाडू भारतावर, येथील संस्कृती, कलाकृतीवर प्रेम करतात. अशाचप्रकारे भारताच्या गाण्यांमद्ये रमणारा, त्यावर व्हिडीओ करणारा एक ऑस्ट्रेलियन खेळाडू कायम चर्चेत असतो. त्यानेच आता काही बॉलीवुड फिल्मसचे फोटो शेअर करत कोणता मूव्ही पाहू? असा प्रश्न विचारला आहे. इतक्या संदर्भानंतर हा खेळाडू कोण हे तुम्ही ओळखले असलेच. हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner). (Australian Cricketer David Warner Shared List of Bollywood Movies and Askes Which Film to Watch)
वॉर्नर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. कधी साऊथ इंडियन गाण्यांवर रील्स बनवून शेअर करणारा वॉर्नर आता कोणता बॉलीवुड मूव्ही पाहू याबद्दल विचारतो आहे. त्याने इंन्स्टाग्रामवर काही बॉलीवुड चित्रपटांच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला ‘Any Recommendations’ असं कॅप्शन देत कोणता चित्रपट पाहू ? असा प्रश्नच नेटकऱ्यांना विचारला आहे. या पोस्टला अनेकजणांनी लाईक केले असून मोठ्या प्रमाणात कमेंटही नेटकरी करत आहेत. ज्यावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यानेही एक नाव सूचवलं आहे. ख्वाजाने वॉर्नरला आमिर खानची फिल्म ‘3 इडियट्स’ पाहण्याचा सल्ला दिला आहे. तर भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी (Shreevats Goswami) याने ‘गँग ऑफ वसेपुर’ चित्रपटाला स्वीट पिक्चर म्हणत तो पाहण्याचा सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
आयपीएलमधील एक महत्त्वाचा आणि स्फोटक फलंदाज म्हणून डेव्हिडला ओळखलं जात. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) वॉर्नरने हैद्राबादचा कप्तान असताना काही खास कामगिरी न केल्याने त्यते कर्णधारपद केन विल्यमसनला द्यावे लागले. त्यामुळे डेव्हिडला यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करता आलीनाही. दरम्यान ऑक्टोबर, सप्टेबरमध्ये पुन्हा आयपीएलचे सामने घेणार असल्याचा निर्णय काही दिवसांपर्वीच बीसीसीआयने दिला. त्यामुळे उर्वरीत आयपीएलमध्ये डेव्हिडची जादू पुन्हा चालल्या त्याचा संघ सनराइजर्स हैदराबाद (SRH) नक्की विजयी होईल.
हे ही वाचा :
(Australian Cricketer David Warner Shared List of Bollywood Movies and Askes Which Film to Watch)