मोठी बातमी : भारत आणि श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ‘या’ दिवशीपासून सुरु होणार सामने, बीसीसीआयने दिली माहिती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 10, 2021 | 4:34 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर कोरोनाचे सावट घोंगावत असल्याने सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सामने सुरु होण्याची तारीख 13 जुलै बदलून पुढे ढकलण्यात आली आहे.

मोठी बातमी : भारत आणि श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, 'या' दिवशीपासून सुरु होणार सामने, बीसीसीआयने दिली माहिती
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

Follow us on

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघाला त्यांच्याच भूमित मात देण्यासाठी श्रीलंकेला पोहोचला आहे. संघातील सर्व खेळाडूने आवश्यक तो विलगीकरणाचा कालावधी संपवून सराव सामने देखील खेळले आणि 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाले होते. पण तितक्यात कोरोनाच्या संकटामुळे सामन्यांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात येणार आहे. (India vs Sri Lanka Series Matches Date Changed Due to Corona Matches Will No Starts From 18 July)

श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला खेळवला जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला यावेळी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यां दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे.

असे असेल नवे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  25 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  29 जुलै

हे ही वाचा :

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

(India vs Sri Lanka Series Matches Date Changed Due to Corona Matches Will No Starts From 18 July)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI