
टीम इंडियाच्या खेळाडूंच नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट येणार आहे, ज्या अंतर्गत पुढच्या वर्षभरासाठी त्यांचा बीसीसीआयशी करार होईल. नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक उलटफेर पहायला मिळू शकतात. 5 खेळाडूंच सेंट्रल कॉन्ट्रेक्टमधून बाहेर होणं स्पष्टपणे दिसतय. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही नव्या करारात रोहित-विराटच डिमोशन होऊ शकतं. BCCI च आत्ताच जे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यात ग्रेड ए प्लसमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे चार खेळाडू आहेत.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जे टीमचे स्टार चेहरे आहेत, त्यांना ग्रेड ए प्लसमध्ये स्थान मिळतं. ग्रेड ए प्लसमधील खेळाडूंना वर्षाला BCCI कडून 7 कोटी रुपये मिळतात. पण रोहित, विराट आणि जाडेजाने एक-एक फॉर्मेट सोडलाय, त्यामुळे या खेळाडूंच ग्रेड ए प्लसमधून बाहेर होणं निश्चित मानलं जातय. नव्या करारात हे ग्रेड ए चा भाग होणार की, ग्रेड बी चा हे सगळं बीसीसीआयवर अवलंबून आहे.
कोणाच डिमोशन होणार?
BCCI च्या सध्याच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रेड ए मध्ये एकूण 6 खेळाडू आहेत. यात आर.अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या आहे. या ग्रेडच्या खेळाडूंना दरवर्षाला बीसीसीआयकडून 5 कोटी रुपये मिळतात. पण आता नव्या करारात रिटायर झालेला अश्विन बाहेर होईल. सिराजच डिमोशन होऊ शकतं. म्हणजे ग्रेड ए मधून तो ग्रेड बी मध्ये येऊ शकतो.
कुठले चार खेळाडू कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर होतील?
BCCI च्या सध्याच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रेड बी चे पाच आणि ग्रेड सी चे 15 खेळाडू आहेत. या दोन्ही ग्रेडमधून सद्यस्थितीत चार खेळाडू नव्या करारातून बाहेर होऊ शकतात. बाहेर होणारे खेळाडू ग्रेड सी मधील आहेत. यात केएस भरत, आवेश खान, रजत पाटीदार आणि जितेश शर्मा आहेत. BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रेड बी च्या खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड सी च्या खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात.
कोणाला बंपर पैसा मिळेल?
BCCI कडून जारी होणाऱ्या टीम इंडियाच्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्या खेळाडूंना स्थान मिळू शकतं?. यात गिल, यशस्वी आणि अक्षर पटेल या तिघांच प्रमोशन होऊ शकतं. म्हणजे ग्रेड बदलल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळू शकतो. गिलला ग्रेड ए मधून ए प्लसमध्ये बढती मिळू शकते. यशस्वी आणि अक्षरला ग्रेड बी मधून ग्रेड ए मध्ये स्थान मिळू शकतं.
श्रेयस अय्यरचा मागच्यावेळी कॉन्ट्रॅक्टमध्ये का समावेश केला नाही?
श्रेयस अय्यरला मागच्यावेळी शिस्तीच कारण देऊन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. पण यावेळी त्याने प्रदर्शनाने उत्तर दिलय. अय्यरशिवाय हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती या खेळाडूंना सुद्धा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळू शकतं.