यंदा गेल, मॅक्सवेल, रस्सेललाही मागे टाकतं हा फलंदाज सिक्सर किंग, म्हणतो ‘ही तर व्यायामाची कमाल’

कोणत्याही क्रिकेट प्रकारात फलंदाजी करताना सिक्सरची किंमत सर्वाधिक असते. त्यात मागील काही वर्षात सर्वत्र टी20 क्रिकेटचं वाढतं वेड यामुळे एका सामन्यातही अनेक षटकार ठोकले जातात.

यंदा गेल, मॅक्सवेल, रस्सेललाही मागे टाकतं हा फलंदाज सिक्सर किंग, म्हणतो 'ही तर व्यायामाची कमाल'
ग्लेन फिलिप्स
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 5:34 PM

मुंबई: टी20 क्रिकेट म्हणजे धमाकेदार फलंदाजी हे गणितच आहे. या प्रकारात फलंदाजांमध्ये जणू षटकार ठोकण्याची शर्यतचं लागते. दरम्यान यामध्ये जगातील अनेक दिग्गज फलंदाज असून एक नाव मागील काही दिवसांत हळूहळू मोठं होत आहे. आतापर्यंत ख्रिस (Chris Gayle), आंद्रे रस्सेल (Andre Russell), ग्लेन मॅक्सवेल (G Maxwell) या धाकड खेळाडूंचा जलवा सर्वाधिक असतो. पण आका यामध्ये अवघ्या 24 वर्षाच्या खेळाडूचं नाव समोर येत आहे. ते म्हणजे न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips). या युवा खेळाडूने यंदाच्या वर्षभरात सर्वाधिक षटकार ठोकले असून यामागे व्यायामाची कमाल असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ग्लेन फिलिप्स एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाला, ”व्यायाम करण्यामुळे मला षटकार ठोकण्याची ताकद मिळाली. माझ्यामते जिममधील माझी मेहनत आणि क्रिकेटचं ज्ञान यामुळेच माझा खेळ चांला होत आहे. कारण ताकदीबरोबर लाईन आणि लेंथची समज असल्यासचं षटकार ठोकण्यात यश येतं.”

साल 2021 मध्ये नवा सिक्सर किंग

2021 या वर्षात ग्लेन फिलिप्सने आतपर्यंत सर्वाधिक 89 षटकार ठोकले आहेत. त्याने 48 सामन्यात 9 अर्धशतक ठोकताना हे षटकार उडवले. फिलिप्सच्या पाठोपाठ इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन असून त्याने 38 सामन्यातील 37 डावांत 82 षटकार ठोकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर एविन लुईस असून त्याने 29 सामन्यात 75 षटकार ठोकले आहेत.

गेल, रस्सेलसह मॅक्सवेलला टाकलं मागे

दरम्यान ग्लेनने दिग्गज खेळाडू रस्सेल, गेल, मॅक्सवेलला यंदा मागे टाकलं आहे. रस्सेलने आतापर्यंत  50, गेलने 41 आणि मॅक्सवेलने 35 षटकारचं लगावले आहेत. दरम्यान आयपीएलच्या पर्वात ग्लेनला अधिक संधी मिळाली नसून तो खास कामगिरी करु शकला नाही. जोफ्रा आर्चरच्या बदली घेण्यात आलेल्या ग्लेनने राजस्थान रॉयल्सकडून 3 सामने खेळताना 2 षटकार ठोकले आहेत.

हे ही वाचा-

RCB vs KKR, Head to Head: विराटसेना केकेआरशी लढतीसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?, तर कोण होणार स्पर्धेबाहेर?

IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा ‘या’ कर्णधारावर विश्वास

IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी

(Behind Glenn phillips Power hitting sixes its his Gym work out)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.