AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी

दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली. त्याचबरोबर क्रिकेटरसिकांना चेन्नईच्या रुपात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला आहे.

IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी
MS Dhoni, Jadeja, Ashwin
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 11:31 AM
Share

दुबई : आयपीएल 2021 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामातील प्लेऑफ सामन्यांमधील पहिला सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात खेळवला गेला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली. त्याचबरोबर क्रिकेटरसिकांना चेन्नईच्या रुपात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. दिल्लीवर मात करत चेन्नईने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात नवव्यांदा फायनल गाठली आहे. (MS Dhoni uses Virender Sehwag formula to defeat Delhi Capitals in first qualifier of IPL 2021)

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी चार विकेट्स आणि 2 चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केलं आहे. सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने या सामन्यात शतकी भागिदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात धुवांधार फलंदाजी करत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्यावर कळस चढवला. धोनीने त्याच्या आक्रमक शैलीत ही मॅच फिनिश केली. धोनीने 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा जमवल्या.

अखेरच्या षटकातला थरार

अखेरच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 13 धावांची आवश्यकता होती. टॉम करनने पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर धोनी स्ट्राईकवर आला. त्यानंतर त्याने सलग दोन चौकार लगावले. दबावात आलेल्या टॉम करनने पुढचा चेंडू वाईड टाकला. चेन्नई समर्थकांचं टेन्शन आणखी कमी झालं. त्यानंतरच्या चेंडूवर धोनीने आणखी एक चौकार लगावत सामना जिंकला. ऋतुराज गायकवाडला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले खरे मात्र सर्वत्र चर्चा फक्त मॅच फिनिश करणाऱ्या धोनीचीच सुरु आहे.

धोनीने त्याच्या स्टाईलमध्येच ही मॅच संपवली, मात्र त्यात कुठेतरी विरेंद्र सहवाग टच दिसत होता. सामन्यानंतर धोनीने त्याच्या स्ट्रॅटेजीबद्दल जे सांगितलं त्यावरुन तुम्हीही म्हणाल की, सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने मॅच फिनिश केली.

सहवाग स्टाईलमध्ये केली मॅच फिनिश

एमएस धोनी सामन्यानंतर म्हणाला, “माझा फंडा सिंपल होता, चेंडू बघा आणि मारा. मी तेच केले.” धोनीने जे काही काय केले, त्याने त्याचा संघ जिंकला. तो सामना संपवण्यात यशस्वी झाला. पण, त्याने वापरलेली पद्धत त्याची नव्हे तर सेहवागची होती. चेंडू पाहा आणि त्यावर तुटून पडा ही सहवागची शैली आहे. माजी भारतीय सलामीवीर जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या याच शैलीसाठी प्रसिद्ध होता.

धोनी म्हणाला, “दिल्लीचे गोलंदाज परिस्थितीचा चांगला वापर करत होते. आम्हाला त्यांच्याविरोधात खेळणे कठीण होत होते. मी यंदाच्या स्पर्धेत काही विशेष केले नाही. त्यामुळे मला वाटले की, मी आधी चेंडू बघेन आणि मग त्यावर प्रहार करेन. गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचा मी अंदाज लावण्याचा प्रयत्न केला.”

ऋतुराज-उथप्पाने किल्ला लढवला

नॉर्खियाने पहिल्याच षटकात फाफ डुप्लेसीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर मात्र ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने संयमी खेळ करत चेन्नईचा डावाला आकार दिला. दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या. ऋतुराजने 50 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा फटकावल्या. तर रॉबिन उथप्पाने 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 63 धावा चोपल्या. हे दोघे चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

दरम्यान, दिल्लीकडून गोलंदाजीत टॉम करनने चमक दाखवली. त्याने 3.4 षटकात 29 धावा देत 3 बळी घेतले. तर आवेश खान आणि एनरीच नॉर्खियाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दिल्लीचा पहिला डाव

तत्पूर्वी, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु धोनीच्या मनसुब्यांवर पृथ्वी शॉने पाणी फेरलं. पृथ्वी शॉने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. पृथ्वी शॉने 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 34 चेंडूत 60 धावा फटकावल्या, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्याने धावगती धिमी झाली होती. मात्र मधल्या षटकांमध्ये शिमरन हेटमायर आणि ऋषभ पंतने डाव सावरला. पंतने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. त्याने 35 चेंडूत 51 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पृथ्वी शॉ आणि पंतच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने चेन्नईसमोर 172 धावांचा डोंगर उभा केला.

चेन्नईकडून गोलंदाजीत जोश हेजलवूडने चांगली कामगिरी केली. त्याने त्याने 4 षटकात 29 धावा देत 2 बळी घेतले. तर रवींद्र जाडेजा आणि मोईन अली आणि ड्र्वेन ब्राव्होने प्रत्येकी एक गडी बाद केला.

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(MS Dhoni uses Virender Sehwag formula to defeat Delhi Capitals in first qualifier of IPL 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.