AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात धोनी धोनी त्याच्या जुन्या रंगात दिसला. त्याचे सगळे चाहते धोनीच्या याच अवताराची आतुरतेने वाट पाहत होते. महेंद्रसिंग धोनीने विजयी फटका लगावला आणि सगळ्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. धोनीच्या विजयी फटक्याने चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये पोहोचली.

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट
एम एस धोनी
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 8:38 AM
Share

मुंबई : आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात धोनी धोनी त्याच्या जुन्या रंगात दिसला. त्याचे सगळे चाहते धोनीच्या याच अवताराची आतुरतेने वाट पाहत होते. महेंद्रसिंग धोनीने विजयी फटका लगावला आणि सगळ्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. धोनीच्या विजयी फटक्याने चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये पोहोचली. या मॅचमध्ये धोनीने दोन रिस्क घेतल्या पण दोन्हीही रिस्क धोनीने सामर्थ्यपणे पेलल्या. पहिली रिस्क होती उथप्पाला अचानकपणे मैदानात उतरवण्याची आणि दुसरी रिस्क होती इनफॉर्म जाडेजाच्या अगोदर बॅटिंगला येण्याची. पण धोनीने कालच्या मॅचमध्ये करुन दाखवलं. अनुभवी चेन्नईने नवख्या दिल्लीला दबावाच्याक्षणी उघडं पाडलं आणि शेवटच्या क्षणी चेन्नईने अफलातून विजय मिळविला.

7 व्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन 6 चेंडूत 18 धावा

ऋतुराज गायकवाड बाद होताच एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा स्कोअर 149/5 होता. कॅप्टन कूलने केवळ 6 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या.

माही मार रहा है

सामना क्षणाक्षणाला दोन्ही संघांच्या बाजूने झुकत होता. सामन्यावर एकावेळी दिल्लीची पूर्णपणे पकड होती. दिल्ली कॅपिटल्स सामना जिंकेल, असं एकाक्षणी वाटत होतं. पण धोनी मैदानात बॅटिंगसाठी उतरला आणि दिल्लीने पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. धोनीला पहिल्याच बॉलने चकवा दिला पण दुसऱ्या बॉलवर धोनीने खणखणीत षटकार ठोकला. पुढे याच आक्रमक अंदाजात धोनीने बॅटिंग करुन चेन्नईला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

धोनीला पाहून छोटी मुलगी भावूक

जेव्हा MS धोनी मैदानात आतिषबाजी करत होता तेव्हा स्टेडियममधील स्टँडमध्ये एक लहान मुलगी खूपच इमोशनल झाली होती. तिने चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातली होती. ‘यलो आर्मी’ जिंकताना पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संबंधित छोट्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. त्यानंतर धोनी सिर्फ नाम नहीं है, इमोशन हैं! असे मेसेज सोशल मीडियावर फिरु लागले.

मुलीला माहीकडून संस्मरणीय भेट

चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर, जेव्हा एमएस धोनीला कळालं की त्याचा विजयी शॉट पाहून लहान मुलगी आणि तिचा भाऊ रडत होते. त्यावेळी माहीने सामन्याचा बॉल चिमुरडीला दिला. धोनीचं गोड गिफ्ट पाहून चिमुरडीही हरखून गेली.

(MS Dhoni Match Winning Knock CSK Little Fan Emotional photo Viral on Social media)

हे ही वाचा :

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.