Australia vs India 2nd Test | ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूला मिळणार खास मेडल

दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. या सामन्यांचं आयोजन मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे करण्यात आलं आहे. हा बॉक्सिंग डे टेस्ट सामना असणार आहे.

Australia vs India 2nd Test | 'बॉक्सिंग डे' सामन्यातील 'मॅन ऑफ द मॅच' खेळाडूला मिळणार खास मेडल
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 2:21 PM

मेलबर्न : क्रिकेटच्या एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात येतं. 1 लाख रुपये आणि ट्रॉफी असं या मॅन ऑफ द मॅच पुरस्कराचं स्वरुप असतं. सध्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात आहे.  (Border Gavaskar Trophy 2020) एकूण 4 सामन्यांची ही मालिका आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामना असणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर म्हणून स्पेशल मेडल देण्यात येणार आहे. या सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलाघ (Johnny Mullagh) मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. best performing player in the Australia vs India ‘Boxing Day’ match will be awarded the Johnny Mullagh Medal

कोण होते जॉनी मुलाघ?

जॉनी मुलाघ हे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार होते. उनारिमन असं त्यांच खरं नाव होतं. मुलाघ हे परदेश दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणारे पहिले कर्णधार होते. मुलाघ यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया 1868 मध्ये ब्रिटेन दौऱ्यावर गेली होती. मुलाघ यांनी या दौऱ्यात एकूण 45 सामने खेळले होते. यामध्ये त्यांनी 23च्या सरासरीने 1 हजार 698 धावा केल्या होत्या. त्यांनी गोलंदाजी करताना एकूण 1 हजार 877 ओव्हर टाकल्या. या 1 हजार 877 ओव्हरपैकी त्यांनी 831 ओव्हर या निर्धाव (मेडन) टाकल्या. तर एकूण 257 विकेट्स घेतल्या. निर्णायक क्षणी त्यांनी टीम साठी विकेटकीपरची भूमिका बजावली होती. विकेटकीपर म्हणून त्यांनी 4 फलंदाजांना स्टंपिग आऊट केलं.

कसं आहे मेडल?

या मेडलचा आकार हा पार्लेजीच्या बिस्किटासारखं आहे. या मेडलच्या खालील बाजूस  THE MULLAGH MEDAL असं लिहिलेलं आहे. तसेच या मेडलच्या मध्यभागी एक फोटोही आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात हे मेडल जिंकण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असेल. यामुळे हे पदक नक्की कोणत्या खेळाडूला मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार

Australia vs India 2nd Test | दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी ‘या’ गोलंदाजाला कसोटी मालिकेसाठी संधी मिळणार?

Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”

Australia vs India | ऑस्ट्रेलियातून निघण्याआधी विराटची सहकाऱ्यांसोबत विशेष बैठक, ‘या’ विषयावर चर्चा

best performing player in the Australia vs India ‘Boxing Day’ match will be awarded the Johnny Mullagh Medal

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.