
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा 6 ते 10 डिसेंबर दरम्यान अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना दिवस-रात्र असल्याने गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा दुसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया या आव्हानासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या एक दिवसआधी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीसाठी फक्त 1 बदल केलाय. ऑस्ट्रेलियाने दुखापतग्रस्त जोश हेझलवूड याच्या जागी स्कॉट बॉलँड याचा समावेश प्लेइंग ईलेव्हनमध्ये केला आहे. हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर झाला तेव्हा त्याच्या जागी संघात दोघांचा कव्हर खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला. मात्र हेझलवूडच्या जागी स्कॉटलाच संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता तसेच झालंय. स्कॉटलाच संधी मिळाली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ईलेव्ह जाहीर
One change confirmed as Australia lock in their playing XI for the second Test against India 👀#AUSvNZ | #WTC25https://t.co/GdZEZwrhQN
— ICC (@ICC) December 5, 2024
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.