AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : सहा वर्षात पहिल्यांदाच नो बॉल, भारताच्या हुकमी गोलंदाजाची छोटी चूक, मोठा विक्रम तुटला

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात उपकर्णधार भुवनेश्वर कुमार एकही विकेट घेऊ शकला नाही. दुसऱ्या सामन्यातही त्याने काही खास सुरुवात केली नसून उलट एका चूकीमुळे सहा वर्षांची मेहनत पाण्यात घातली आहे.

IND vs SL : सहा वर्षात पहिल्यांदाच नो बॉल, भारताच्या हुकमी गोलंदाजाची छोटी चूक, मोठा विक्रम तुटला
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातील एक क्षण
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 5:00 PM
Share

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सुरु असून या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघालाच प्रथम गोलंदाजी करावी लागत आहे. दरम्यान भारताचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) सामन्यात सुरुवातीला गोलंदाजीची मदार सांभाळली. यावेळी विकेट तर सोडा पण त्याचाच एक मोठा रेकॉर्ड त्याच्या एका छोट्या चूकीमुळे तुटला. सामन्यातील पाचवी ओव्हर टाकत असताना भुवीने चूकून नोबॉल टाकला. या नो ब़ॉलमुळे मागील सहा वर्षे वनडे क्रिकेटमध्ये एकही नोबॉल न टाकण्याचा भुवीचा रेकॉर्ड तुटला.

भुवीने याआधी ऑक्टोबर, 2015 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये शेवटचा नोबॉल टाकला होता. त्यानंतर त्याने कधी बोलिंगची सीमारेषा पार न करता उत्तम अशी बोलिंग केली होती. भुवनेश्वर कुमारने वनडे क्रिकेटमध्ये सलग 515.6 ओव्हर म्हणजेच 3 हजार 93 चेंडू विना नोबॉल टाकता टाकले आहेत.

टी-20 मध्येही भुवनेश्वरची चोख गोलंदाजी

भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये नोबॉल न टाकता सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा रेकॉर्डही भुवनेश्वर कुमार याच्याच नावावर आहे. त्याने तब्बल 1 हजार 34 चेंडू म्हणजेच 172 ओव्हर एकही नोबॉल न टाकता फेकल्या आहेत. त्याच्यानंतर युवा खेळाडू वॉशिंगटन यानेही आतापर्यंत 621 चेंडू फेकले असून त्यात एकही नोबॉल टाकलेला नाही.

भुवी काही काळापासून दुखापतींनी ग्रस्त

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला एकही विकेट मिळाला नाही. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर उपकर्णधार असणाऱ्या भुवीवर अधिक ताण आला असणार हे नक्की.  त्याने आतापर्यंत भारतासाठी 21 टेस्ट, 118 वनडे आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात टेस्टमध्ये 63, वनडेमध्ये 138 आणि टी-20 मध्ये 45 विकेट्स मिळवले आहेत. 2012 पासून भारतीय संघात असणारा भुवी मागील काही काळापासून वेगवेगळ्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदादीवरही याचा परिणाम दिसून येत आहे.

हे ही वाचा

IND vs SL : युझवेंद्र चहलसाठी आजचा सामना महत्त्वाचा, एका ‘षटकाराने’ करु शकतो शमीच्या विक्रमाशी बरोबरी

विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

(Bhuvneshwar kumar Bowles first No ball in last six years at One day Cricket in Indvs Sl 2nd ODI)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल