AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | सॉरी सर…साध्या माणसांची छोटीशी इच्छा पूर्ण करताना रोहितने असं जिंकलं मन, एकदा हा VIDEO बघा

Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अलीकडेच जामनगरला गेला होता. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये रोहित सहभागी झालेला. रोहित आपल्या कुटुंबासोबत त्या कार्यक्रमाला पोहोचला होता. आता रोहित शर्मा धर्मशाला येथे दाखल झालाय. 7 मार्चपासून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना सुरु होणार आहे.

Rohit Sharma | सॉरी सर…साध्या माणसांची छोटीशी इच्छा पूर्ण करताना रोहितने असं जिंकलं मन, एकदा हा VIDEO बघा
Rohit sharma Image Credit source: AFP
| Updated on: Mar 06, 2024 | 11:28 AM
Share

IND vs ENG | धर्मशाळा टेस्ट जिंकणं हे रोहित शर्माच पुढच मिशन आहे. 7 मार्चपासून या टेस्ट मॅचची सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्घ हा सीरीजमधील शेवटचा कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टॉप स्थान टिकवण्यासाठी विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या मॅचआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची माफी मागण्यात आली. रोहित शर्मा एअरपोर्टवर होता. तो आपल लगेज घेऊन चेक इन करत होता. त्याचवेळी काही कॅमरामन त्याचे फोटो काढू लागले. या नंतर एकजण असं काहीतरी बोलला की, रोहितच्या चेहऱ्यावरचे थोडे हाव-भाव बदलले. त्यानंतर कॅमेरामनने रोहितची माफी मागितली. रोहितने पण फॅन्सच मन जिंकण्यात कुठलीही कसूर ठेवली नाही.

कॅमेरामनने रोहितची माफी मागितल्यानंतर सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. रोहितने त्यांना नाराज केलं नाही. त्यांच्यासोबत फोटो काढले. एअरपोर्टवर सगळेच लोक यामुळे खुश झाले. रोहित जामनगरमध्ये अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर होता. पत्नी रितिका सजदेह सोबत होती.

धर्मशाळा टेस्ट रोहितसाठी खास

धर्मशाळा टेस्ट रोहित शर्मासाठी खूप खास आहे. कारण रोहित या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. धर्मशाळामध्ये आतापर्यंत एकमेव टेस्ट मॅच झालीय. त्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. रोहित कॅप्टन असून तो पहिल्यांदा या मैदानावर खेळताना दिसेल. टेस्ट सीरीजमध्ये रोहितने चांगलं प्रदर्शन केलय. राजकोट टेस्टमध्ये रोहितने शतक सुद्धा झळकवलेलं. धर्मशाळामध्ये रोहित चांगल प्रदर्शन करुन टीमला विजय मिळवून देईल अशी अपेक्षा आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल