AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI Test Series : वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्मा ‘या’ 3 प्लेयर्सच मन मोडणार, त्यांना बसवणार बेंचवर

IND vs WI Test Series : टीम इंडिया लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 12 जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरु होईल. कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या कसोटीत काही चांगल्या प्लेयर्सना प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकतो.

IND vs WI Test Series : वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्मा 'या' 3 प्लेयर्सच मन मोडणार, त्यांना बसवणार बेंचवर
Rohit SharmaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 30, 2023 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरीज येत्या 12 जुलैपासून सुरु होणार आहे. 12 जुलैला वेस्ट इंडिजच्या डॉमिनिकामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 निवडणं, कॅप्टन रोहित शर्मासाठी सोपं नसेल. पहिल्या कसोटी सामन्यात 3 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवलं जाऊ शकतं.

या तीन प्लेयरच वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बेंचवर बसणं निश्चित आहे. या तिन्ही खेळाडूंचा अजिबात विचार होणार नाही.

कोणाला संधी मिळेल?

वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन स्पिन गोलंदाजी विभागाच नेतृत्व करेल. त्याला रवींद्र जाडेजा साथ देईल. या कसोटी सामन्यात तिघांना बेंचवर बसावं लागेल. पहिल्या कसोटीत हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि जयदेव उनाडकट या तिघांना संधी देतील. प्लेइंग इलेव्हनमधून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला वगळलं जाईल.

टीम इंडियाकडून टेस्ट डेब्यु कोण करणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीत विकेटकीपर फलंदाज केएस भरतला सुद्धा बाहेर बसवलं जाईल. इशान किशनला या कसोटीत डेब्युची संधी मिळेल. इशान किशन 7 व्या नंबरवर धुवाधार बॅटिंग करु शकतो. रोहित शर्मासाठी इशान किशन ब्रह्मास्त्र ठरु शकतो. केएस भरत विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून प्रभावी ठरलेला नाही.

दोघांमध्ये प्राधान्य कोणाला?

रवींद्र जाडेजाच पहिल्या कसोटीत खेळणं निश्चित आहे. त्यामुळे डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला बाहेर बसाव लागेल. दोघेही ऑलराऊंडर आहेत. पण अनुभव आणि परफॉर्मन्स लक्षात घेता, रवींद्र जाडेजाला प्राधान्य मिळेल.

वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, जयदेव उनादकट. टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.