कर्णधार सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला सर्वांसमोर झापलं, कारण की…

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा टी20 सामना भारताने 167 धावा देऊनही सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 119 धावा करू शकला. या सामन्यात शिवम दुबेने मोलाचा वाटा उचलला. पण असं असूनही सूर्यकुमार यादवकडून ओरडा पडला. जाणून घ्या कारण...

कर्णधार सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला सर्वांसमोर झापलं, कारण की...
कर्णधार सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला सर्वांसमोर झापलं, कारण की...
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 06, 2025 | 6:53 PM

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. खरं तर ऑस्ट्रेलियासमोर फक्त 167 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हे आव्हान सहज गाठेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. भारताने ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला 119 धावांवर गुंडाळलं. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. या विजयात अष्टपैलू शिवम दुबेने मोलाचा वाटा उचलला. प्रथम फलंदाजी करताना 22 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत दोन विकेट घेतल्या. पण इतकी चांगली कामगिरी केलेल्या शिवम दुबेला सामन्यात ओरडा पडला. सामन्यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्यावर नाराज झाला होता. इतकंच काय तर सूर्यकुमारने त्याला सर्वांसमोर झापलं. नेमकं असं काय झालं की शिवम दुबेला ओरडा पडला ते जाणून घेऊयात.

सूर्यकुमारने शिवम दुबेला झापलं

सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला 12व्या षटकावेळी झापलं. झालं असं की, या षटकात शिवम दुबेने टिम डेविडची विकेट काढली होती. पण शेवटच्या चेंडूवर मार्कस स्टोयनिसने त्याला चौकार मारला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव संतापला आणि त्याने सर्वांसमोर शिवम दुबेला झापलं. त्याला पडलेला ओरडा हा चौकारासाठी नव्हता. तर फिल्डिंगच्या हिशेबाने चेंडू न टाकल्याने सूर्यकुमार यादव वैतागला होता. दुबेला भलेही ओरडा पडला असेल. पण त्याने या सामन्याचं चित्र बदललं हे देखील तितकंच खरं आहे. शिवम दुबेने कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेविडची विकेट काढली. हे दोन्ही खेळाडू सामन्याचं चित्र कोणत्याही क्षणी बदलण्याची ताकद ठेवतात.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने विजयाचं श्रेय फलंदाजांना देत म्हणाला की, सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विशेषतः अभिषेक आणि शुबमनला श्रेय जाते. पॉवरप्लेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली ती हुशारीने केली. त्यांना लवकर लक्षात आले की ही 200हून अधिक धावांसाठी सामान्य खेळपट्टी नाही. सर्वांनीच चांगली कामगिरी केली आणि बॅटने संपूर्ण सांघिक प्रयत्न केले. बाहेरून आम्हाला स्पष्ट संदेश होता. मी आणि गौतम गंभीर एकाच पानावर ठाम होतो.