
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत प्रवेश करण्याची लढत सुरु आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल गमावला. वनडे वर्ल्डकप 2023 पासून सुरू असलेला कित्ता या सामन्यातही कायम राहिला. भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी करण्याची वेळ आली. या सामन्यात टीम इंडियासमोर ट्रेव्हिस हेडचं मोठं आव्हान होतं. त्याला झटपट बाद करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण ट्रेव्हिस हेड टिकला तर काय करू शकतो याचं भान प्रत्येक क्रीडाप्रेमीला होतं. कर्णधार रोहित शर्माने संघाचा पहिलं षटक मोहम्मद शमीकडे सोपवलं. ट्रेव्हिस हेडला स्वस्तात बाद करण्याचा हेतू होता. तशी संधी चालून आली होती. पण मोहम्मद शमीने चूक केली. ट्रेव्हिस हेड शमीचा चेंडू खेळताना धडपडला आणि बॅटला कट लागून थेट चेंडू मोहम्मद शमीच्या हाती गेला. पण या संधीची सोनं करता आलं नाही. वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केलं. पण तिथपर्यंत त्याने 39 धावा केल्या होत्या.
ट्रेव्हिस हेडला बाद करण्याची दुसरी संधी हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीतही हुकली. संघाचं चौथ षटक टाकत असताना तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या षटकार मारला. त्यामुळे हेड आता महागात पडणार असंच वाटलं. पाचव्या चेंडूवर प्वॉइंटच्या दिशेने रवींद्र जडेजाच्या बाजूला मारला. जडेजाने चेंडू पकडला आणि एक धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईकच्या दिशेने धाव घेतली. खरं तर जडेजाचा हा थ्रो स्टंपला लागला असता तर बादच झाला असता. पण ट्रेव्हिस हेड भारतासाठी संकट ठरला. पुढच्या षटकात ट्रेव्हिस हेडने शमीला तीन चेंडूत तीन चौकार मारले.
Mohammad Shami Dropped Travis Head Catch 😮😮.#INDvsAUS #TravisHead #IndiavsAustralia #IndvsAusfinal #IndiaVsAus #RohitSharma𓃵 pic.twitter.com/SOLsR7cfBM
— CSN (@Cricketand56672) March 4, 2025
Jadeja’s reaction after missing the runout of Travis Head pic.twitter.com/uipr6c3qLB
— Radha (@Rkc1511165) March 4, 2025
मोहम्मद शमीने दुसरं षटक मात्र दमदार टाकलं. हेडला बाद करण्यात चूक केली. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या कूपर कोनोलीला संघाच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकात बाद केलं. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्याने 9 चेंडूचा सामना केला पण फलंदाजी करताना त्याच्या बॅटला बॉलच लागत नव्हता. ऑऊट झालेल्या चेंडूवर बॉल लागला खरा आणि विकेटच्या मागे केएल राहुलने त्याचा उत्तम झेल पकडला.