IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने अशी निवडली प्लेइंग 11, या खेळाडूंना दिली संधी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. तर पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. भारताने हा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरी पोहोचेल. त्यामुळे रोहित शर्माने प्लेइंग 11 निवडताना काळजी घेतली आहे.

IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने अशी निवडली प्लेइंग 11, या खेळाडूंना दिली संधी
| Updated on: Feb 23, 2025 | 2:19 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याचा नाणेफेकीचा कौल झाला आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने सलग नाणेफेक गमवण्याची ही 12वी वेळ आहे. यामुळे भारताच्या वाटेला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची वेळ आहे. त्यामुळे भारताला आता पाकिस्तानला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने सांगितलं की, आम्ही प्रथम फलंदाजी करू. चांगली पृष्ठभाग दिसतेय. चांगले लक्ष्य ठेवायचे आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो, आम्ही गोष्टी सामान्य ठेवू. मुले या परिस्थितीशी परिचित आहेत, आम्ही येथे चांगली कामगिरी केली आहे आणि आज आम्हाला आमचे सर्वोत्तम करायचे आहे. आम्ही आमचा शेवटचा सामना गमावला, पण आता आमच्यासाठी तो काळ संपला आहे. एक बदल केला असून फखर ऐवजी इमाम संघात आहे.’ दरम्यान या सामन्याचा निकाल दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण पाकिस्तानने हा सामना गमावला तर स्पर्धेतून बाहेर, तर भारताने हा सामना गमावला तर शेवटच्या सामन्यात करो या मरोची लढाई असेल.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावल्यानंतर स्पष्टच सांगितलं की, काही फरक पडत नाही, त्यांनी नाणेफेक जिंकली म्हणून आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गेल्या सामन्यासारखेच दिसते, मैदानाची पृष्ठभाग मंदावलेली आहे. आमच्याकडे फलंदाजीत अनुभवी खेळाडू आहेत त्यामुळे खेळपट्ट्या मंदावल्यास आम्हाला काय करावे लागेल हे आम्हाला माहिती आहे. संघाकडून एकूण कामगिरीची आवश्यकता आहे. शेवटचा सामना आमच्यासाठी सोपा नव्हता. तुम्हाला दबावाखाली राहून स्वतःची चाचणी घ्यायची असते. आम्ही त्याच संघासह खेळत आहोत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद