CSK vs SRH IPL 2022 : आयपीएलमध्ये ऋतुराज रंगात! 12 चेंडूत तब्बल 60 धावा, पाहा Highlights Video

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या. तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला.

CSK vs SRH IPL 2022 : आयपीएलमध्ये ऋतुराज रंगात! 12 चेंडूत तब्बल 60 धावा, पाहा Highlights Video
Ruturaj gaikwad
Image Credit source: social
| Updated on: May 01, 2022 | 10:32 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (CSK vs SRH) सामना होत आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा डबल हेडरचा सामना आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर ही मॅच होत आहे. आयपीएलमधला हा 46 वा सामना आहे. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर (MS Dhoni) होत्या. कारण रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) तडकाफडकी सीएसकेची कॅप्टनशिप सोडल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, यात एमएस धोनीने फक्त आठ धावा काढल्या. तो नटराजनच्या बॉलवर उमरान मलिककडून आऊट झाला. धोनीने फक्त आठ धावा काढल्या. त्यापैकी एक चौकार आहे. तर सर्वाधिक चांगल्या धावा ऋतुराज गायकवाडने काढल्या त्याने 57 बॉलमध्ये 99 धावा काढल्या. यामध्ये सहा षटकार आणि तितक्याच चौकारांचा समावेश आहे.त्यानंतर कॉन्वेनं 55 बॉलमध्ये 85 धावा काढल्या. यात 4 षटकार आणि तब्बल 8 चौकारांचा समावेश आहे. तर रविंद्र जडेजाने फक्त एक धावा काढली.

ऋतुराज गायकवाडचे सह षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक 99 धावा

चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 203 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने दोन गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या. तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून टी नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या.

ऋतुराज गायकवाड जोरात

डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद

डेव्हन कॉनवेच्या जोरदार धावा, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हैदराबाद संघाने एकूण 8 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर 3 सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये एकूण 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर नेट रेट 0.600 आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स पॉई्ट्स टेबलमध्ये नवव्या क्रामांकावर आहे.

SRH ची प्लेइंग – 11 केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, टी.नटराजन, उमरान मलिक,

CSK ची प्लेइंग – 11 एमएस धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, ड्वेन कॉनवे, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी आणि महीश तीक्ष्णा,