IPL 2022, DC vs CSK : चेन्नईचं दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य, कॉनवेचं अर्धशतक, पाहा Highlights Video

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आठ चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला. धोनीने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले.

IPL 2022, DC vs CSK : चेन्नईचं दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य, कॉनवेचं अर्धशतक, पाहा Highlights Video
कॉनवेचं अर्धशतक
Image Credit source: twitter
| Updated on: May 08, 2022 | 10:13 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पहिले फलंदाजी करताना सीएसकेच्या ऋतुराज गायकवाडने 41 धावा आणि डेव्हॉन कॉनवेनं 87 धावा करत 110 धावांची भागीदारी करून चेन्नईला झंझावाती सुरुवात करून दिली. यानंतर दुबेनं 32 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी CSK अडखळला, ज्यामुळे संघ केवळ 208 धावांपर्यंत पोहोचू शकला. धोनीने 8 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळली. दिल्लीकडून नोरखियाने तीन तर खलील अहमदने दोन गडी बाद केले. चेन्नईने या मोसमात चौथ्यांदा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या असून दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलंय.

पहिली इनिंग, दिल्लीला 209 धावांचं लक्ष्य

पॉवरप्लेमध्ये एकही विकेट पडली नाही

पॉवरप्लेच्या सहा षटकांच्या समाप्तीनंतर चेन्नई सुपर किंग्जने एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज 18 चेंडूत 24 आणि डेव्हन कॉनवे 19 चेंडूत 29 धावांवर फलंदाजी करत आहेत. दोघांमधील ही सलग तिसरी 50 हून अधिक धावांची भागीदारी आहे.

चेन्नईला पहिला धक्का

11व्या षटकात एनरिक नॉर्टजेनं चेन्नईला पहिला धक्का दिला. त्यानं ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऋतुराजचे अर्धशतक हुकले. तो 33 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. ऋतुराजने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. नॉर्टजेने ताशी 152 किमी वेगाने छोटा चेंडू टाकला. त्यावर ब्रिज टाकण्याच्या प्रयत्नात ऋतुराजने विकेट गमावली.

ऋतुराजचे अर्धशतक हुकले, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डेव्हॉन कॉनवेचं अर्धशतक

डेव्हॉन कॉनवेनं आयपीएल कारकिर्दीतील तिसरं अर्धशतक झळकावलंय. त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने हैदराबाद आणि बंगळुरूविरुद्धही अर्धशतके झळकावली होती. दुसरीकडे, चायनामन गोलंदाज कुलदीप यादवसाठी हा सामना आतापर्यंत काही खास ठरला नाही. त्याने दोन षटकात 34 धावा दिल्या आहेत. या दोन्ही षटकात कॉनवेने त्याला फटकेबाजी केली. कुलदीप डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने या षटकात 18 धावा दिल्या. कॉनवेने शेवटच्या तीन चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याचवेळी कुलदीपच्या 10व्या षटकात 16 धावा आल्या. या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर कॉनवेने सलग तीन चौकार मारले.

डेव्हिडचं तिसरं अर्धशतक, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

धोनी नाबाद राहिला

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आठ चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला. धोनीने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले.

धोनीचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कॉनवे शतक हुकलं

चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का 17व्या षटकात 169 धावांवर बसला. खलील अहमदने डेव्हन कॉनवेला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. कॉनवे शतक हुकलं. तो 49 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. कॉनवेनं आपल्या खेळीत सात चौकार आणि पाच षटकार मारले. त्याने शिवम दुबेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली.

कॉनवेची विकेट गेली, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या असून दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलंय.