
मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) खूपच रोमँटिक आहे. त्याने 2021 साली यूएई (UAE) मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत गर्लफ्रेंडला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. याचवर्षी त्याने मोठ्या धूम धडाक्यात लग्न केलं. नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात जवळपास साडेसहा महिन्यांनी दीपक चाहरने मैदानात पुनरागमन केलं. दरम्यान चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दीपक चाहरचा एक व्हिडिओ शेयर केलाय. यात दीपक चाहर पत्नीसोबत फेरफटका मारण्यासाठी, शॉपिंगसाठी बाहेर पडल्याचं दिसतय.
दोघेही चेन्नई फिरण्यासाठी निघाले होते. ते बीच वर गेले. शॉपिंग केली. शहरातील खाद्य पदार्थांचा अस्वाद घेतला. हे जोडपं शहरातील एका प्रसिद्ध साडी दुकानात गेलं. तिथे दीपकने जयासाठी साडी पसंत केली. दीपकने आपल्यासाठी दुकानातून खास वस्तू विकत घेतल्याचं जयाने सांगितलं. दीपकच माझ्यासाठी कपडे निवडतो, असं जया म्हणाली. या जोडप्याने दुकानाबाहेर लागलेल्या स्टॉलवर चणे खाण्याचा सुद्धा आनंद घेतला. दीपक जयाला एका हॉटेल मध्येही घेऊन गेला. तिथे दोघांनी चेन्नईच्या लोकप्रिय फिल्टर कॉफीचा आस्वाद घेतला. हे सगळं या व्हिडिओ मध्ये आहे.
आम्ही दोघे एका पार्टी मध्ये भेटलो होतो. त्यानंतर सोशल मीडियावर आम्ही चर्चा सुरु केली. दिल्ली मध्ये आमची पहिली भेट झाली होती. दीपक त्यावेळी श्रीलंका दौऱ्यावर जात होता. दिल्लीवरुन त्याची फ्लाइट होती. दोघांनी तिथे काही वेळ एकत्र घालवला. चेन्नई सुपर किंग्सने या जोडप्यासोबत एक व्हिडिओ शेयर केलाय. यात दोघांनी त्यांची मनं कशी जुळली, ते सांगितलं. जयाने सर्वप्रथम तिच्या मनातली गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी आयपीएलच्या बबल मध्ये एकत्र वेळ घालवला. तिथे त्यांनी परस्परांना समजून घेण्यासाठी वेळ मिळाला.
बायो बबल मुळेच आमची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली. बायो बबल मध्ये आम्ही काही महिने एकत्र होतो. तिथेच आम्हाला आम्ही आयुष्य एकत्र घालवू शकतो, याची जाणीव झाली. त्यानंतर दीपक आणि जयाने लग्नाचा निर्णय घेतला.