CSK vs MI Live Score Updates, IPL 2026: तिलक वर्माही माघारी, पलटण अडचणीत
Chennai Super Kings vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Live Score Updates: चेपॉक स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 2 यशस्वी संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात कडवी झुंज आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
CSK vs MI Live Score Updates : सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला तिसरा धक्का
रामकृष्ण घोष याने सूर्यकुमार यादव याला डेवाल्ड ब्रेव्हीस याच्या हाती कॅच आऊट करत मुंबईला तिसरा झटका दिला आहे. सूर्याने बॉलमध्ये 12 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. सूर्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र सूर्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
-
CSK vs MI Live Score Updates : मुंबईला दुसरा धक्का, रायन रिकेल्टन आऊट
चेन्नईने मुंबईला दुसरा झटका देत सेट नमन धीर आणि रायन रिकेल्टन ही जोडी फोडली आहे. नूर अहमद याने सातव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रायन रिकेल्टन याला उर्विल पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 24 बॉलमध्ये 37 धावा केल्या.
-
-
CSK vs MI Live Score Updates : नमन धीर-रायन रिकेल्टनची फटकेबाजी, दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
मुंबईने विल जॅक्स याच्या रुपात 1 धावेवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर नमन धीर आणि रायन रिकेल्टन या जोडीने कमाल केली. रायन आणि नमनने फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी 6 ओव्हरमध्ये मुंबईला 57 धावांपर्यंत पोहचवलं.
-
CSK vs MI Live Score Updates : मुंबईला पहिला झटका, विल जॅक्स आऊट
चेन्नईने मुंबईला आठव्या बॉलवरच पहिला झटका दिला आहे. अंशुल कंबोज याने मुंबईला डावातील दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विल जॅक्स याला आऊट केलं. विलने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
CSK vs MI Live Score Updates : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, विल जॅक्स-रायन रिकेल्टन मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून विल जॅक्स-रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
-
CSK vs MI Live Updates : चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी.
-
CSK vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रॉबिन मिंझ, ट्रेंट बोल्ट, क्रिश भगत आणि जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.
-
CSK vs MI Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, चेन्नई विरुद्ध बॅटिंग
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने चेन्नई विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आता किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
CSK vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, अश्वनी कुमार, शार्दुल ठाकूर, मयंक रावत, रघु शर्मा, क्रिश भगत, राज बावा, रोहित शर्मा, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
CSK vs MI Live Updates : चेन्नई सुपर किंग्स टीम
चेन्नई सुपर किंग्स टीम : संजू सॅमसन(विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड(कर्णधार), उर्विल पटेल, सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत वीर, रामकृष्ण घोष, मॅथ्यू शॉर्ट, महेंद्रसिंह धोनी, मॅट हेन्री, स्पेन्सर जॉन्सन, झकरी फॉल्केस, श्रेयस गोपाल, राहुल चहर, आकाश मधवाल आणि अमन खान.
-
CSK vs MI Live Updates : चेन्नई विरुद्ध मुंबई हायव्होल्टेज सामना, कोण जिंकणार?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. चेपॉक स्टेडियममध्ये उभयसंघातील सामन्याचा थरार रंगणार आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांचा नववा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंडमध्ये एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांची ही या हंगामातील आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी 24 एप्रिलला झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबई चेन्नईला पराभूत करुन गेल्या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.