काउंटीमुळे नशीब पालटलं, Cheteshwar Pujara पुन्हा दिसणार टीम इंडियात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात येऊ शकतो.

काउंटीमुळे नशीब पालटलं, Cheteshwar Pujara पुन्हा दिसणार टीम इंडियात
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:32 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL 2022) 15 वा सीजन संपल्यानंतर टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय दौरे आणि मालिकांना सुरुवात होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाला आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (India England Tour) जाईल. या दोन्ही मालिकांसाठी निवड समिती दोन वेगवेगळे संघ निवडणार असल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात येऊ शकतो. बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियात झालेलं त्यांच हे पुनरागमन असेल. दुसरा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी निवडला जाईल. इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या समावेशाची शक्यता तशी धुसरच होती. पण आता दुखापतीमुळे ती शक्यताही मावळली आहे. क्रिकेबझच्या वृत्तानुसार, अजिंक्यला ग्रेड थ्री ची हॅमस्ट्रिंग इंजरी झाली आहे. त्यामुळे आयपीएलमधले उर्वरित सामनेही त्याला खेळता येणार नाहीयत.

चेतेश्वर पुजाराचं मात्र कमबॅक

इंग्लंड दौऱ्यापर्यंत तो फिट होण्याची शक्यताही नाहीय. त्याचवेळी अजिंक्य सोबत खराब फॉर्ममुळे संघाबाहेर गेलेला चेतेश्वर पुजारा मात्र कमबॅक करु शकतो. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजारा दमदार कामगिरी करतोय. त्याने तिथे द्विशतक झळकावली आहेत. इंग्लिश वातावरणात खेळण्याचा त्याने चांगला सराव केलाय. त्यामुळे भारतीय संघात तो कमबॅक करु शकतो.

सीम गोलंदाजांचा सामना करणं, सोप नाहीय

“आमच्या योजनेतून पुजारा कधीच बाहेर नव्हता. त्याने त्याचा फॉर्म परत मिळवणं आवश्यक होतं. माझ्या मते त्याने तो फॉर्म परत मिळवलाही आहे. सेकंड डिव्हिजनच्या काउंटीमध्ये त्याने शतक झळकावली असतील, पण इंग्लिश वातावरणात सीम गोलंदाजांचा सामना करणं, सोप नाहीय. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी द्यायची की, नाही ते संघ व्यवस्थापनावर अवलंबून असेल” असं निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तो फॉर्मसाठी चाचपडत होता

चेतेश्वर पुजाराचं कमबॅक मोठी गोष्ट आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वारंवार संधी मिळूनही तो प्रभाव पाडू शकला नव्हता. त्याला सातत्याने संघाबाहेर करण्याची मागणी होत होती. खराब कामगिरीमुळेच त्याला मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरुद्घच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. रणजी सामन्यांमध्ये तो फॉर्मसाठी चाचपडत होता. पण आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळून त्याने त्याचा फॉर्म परत मिळवला. तिथे त्याने शतक, द्विशतक झळकावली आहेत.

रोहित शर्मा इंग्लंडमध्ये कधी जाणार?

मागच्यावर्षी सुद्धा श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारताने दोन संघ निवडले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते. रोहित शर्मा 15 जून पर्यंत इंग्लंडमध्ये जाऊ शकतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.