Chris Gayle: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिस गेलला पाठवला संदेश, त्यावर त्याने असा दिला प्रतिसाद

Chris Gayle: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिस गेलला पाठवला संदेश, त्यावर त्याने असा दिला प्रतिसाद
CHRIS GAYLE

42 वर्षाच्या गेलने क्रिकेटमध्ये स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला आहे. चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा करण्याचे कौशल्य गेलकडे आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 3:19 PM

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा (West indies) आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) बुधवारी भारताला 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तीगत संदेशाने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. या कृतीमधून पंतप्रधान मोदी आणि भारताबरोबरचे माझे संबंध भक्कम असल्याचं अधोरेखित होतं. “मी भारताला 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तीगत संदेशाने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. यातून पंतप्रधान मोदी आणि भारतीयांसोबतचे संबंध भक्कम असल्याचं अधोरेखित होतं. युनिव्हर्स बॉसकडून शुभेच्छा” असे गेलने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

42 वर्षाच्या गेलने क्रिकेटमध्ये स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला आहे. चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा करण्याचे कौशल्य गेलकडे आहे. गेल भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. IPL मध्ये त्याने अनेक धमाकेदार इनिग्ज खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये गेलने केकेआर, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व केलं आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कसोटीमध्ये त्रिशतक, वनडेमध्ये डबल सेंच्युरी आणि टी-20 मध्ये शतक झळकावण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये त्याने 1,854 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. 2016 वर्ल्डकप स्पर्धेत टी-20 मध्ये शतक झळकावल्यानंतर गेलच्या धावांचा वेग मंदावला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें