T20 Mumbai 2026 Final: अंतिम सामना सुरू असताना मैदानात राडा, अर्जुन तेंडुलकरच्या संघासोबत काय झालं?

Arjun Tendulkar in T20 Mumbai Final: टी20 मुंबई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्स आणि आर्क्स अंधेरी हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना मराठा रॉयल्सने 8 धावांनी जिंकला. पण हा सामना सुरू असताना राडा झाला आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

T20 Mumbai 2026 Final: अंतिम सामना सुरू असताना मैदानात राडा, अर्जुन तेंडुलकरच्या संघासोबत काय झालं?
| Updated on: Jun 14, 2026 | 4:32 PM

टी20 मुंबई 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्स आणि आर्क्स अंधेरी यांच्यात लढत झाली. आर्क्स अंधेरीने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मराठा रॉयल्स संघाने 20 षटकात पाच गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही आर्क्स अंधेरीला गाठता आलं नाही आणि 20 षटकात 8 गडी गमवून 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना आर्क्स अंधेरीने 8 धावांनी गमावला. हा सामना अतितटीचा झाला आणि शेवटच्या चेंडूवर या सामन्याचा निकाल लागला. अर्जुन तेंडुलकर खेळत असलेला आर्क्स अंधेरी संघ 8 धावांनी पराभूत झाला. या सामन्याचा निकाल मराठा रॉयल्सच्या बाजूने लागला असला तरी या सामन्यादरम्यान बराच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अंतिम सामना जिंकण्याचा दबाव खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यात दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी भिडले.

शेवटच्या षटकात 14 धावांची गरज आणि…

टी20 मुंबई लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकात आर्क्स अंधेरीला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. मराठा रॉयल्सकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी रोहन राजे आला. त्याने या षटकात फक्त 5 धावा दिल्या आणि विजयी जल्लोष साजरा केला. विजय झाल्यानंतर रोहन राजेने जर्सी काढली आणि मैदानावर धावून लागला. मराठा रॉयल्सचे इतर खेळाडूही रोहन राजेच्या आनंदात सहभागी झाले. पण या विजयापूर्वी तुषार देशपांडे आणि गौरव जठार यांच्यात वाद झाला. त्यामुळे डगआऊटमधून धावत येत अंधेरीचा कर्णधार शिवम दुबेने हे प्रकरण शांत केलं. तसेच गौरव जठारला बाजूला घेऊन गेला.

आर्क्स अंधेरीला 18 चेंडूत 38 धावांची गरज होती. मैदाताना शिवम दुबे आणि गौरव जठार होते. 18 वं षटक टाकण्यासाठी तुषार देशपांडे आला आणि त्याने 13 धावा देत शिवम दुबेची विकेट काढली. त्यानंतर 12 चेंडूत 25 धावा अशी स्थिती आली होती आणि 19वं षटक टाकण्यासाठी इरफान उमेर आला होता. त्याने या षटकात 11 धावा देऊन दोन विकेट काढल्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने गौरव जठारची विकेट काढली. जठार डगआऊटमध्ये जात असताना वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि गौरव जठार यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. पण हे प्रकरण पंच आणि खेळाडूंनी तात्काळ सोडवलं.

अर्जुन तेंडुलकरची कामगिरी

अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात आर्क्स अंधेरीकडून पाचपैकी दोन बळी घेतले. त्याने चार षटकांत 36 धावा देत मराठा रॉयल्सचा सलामीवीर मधुकर यादव आणि मधल्या फळीतील फलंदाज अयाझ खान यांना बाद केले. फलंदाजीत अर्जुन काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत फक्त 2 धावा केल्या आणि बाद झाला.

Follow Us