AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CPL 2024 : सीपीएलचा 29 ऑगस्टपासून थरार, सामने कुठे पाहता येणार?

Cpl 2024 Schedule Live Streaming : वेस्ट इंडिज मध्ये आजपासून कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 12 व्या सत्राला सुरुवात होत आहे. जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक.

CPL 2024 : सीपीएलचा 29 ऑगस्टपासून थरार, सामने कुठे पाहता येणार?
cpl t20Image Credit source: cpl t20 facebook
| Updated on: Aug 29, 2024 | 4:50 PM
Share

वेस्ट इंडिजमध्ये जून महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वेस्ट इंडिजमध्ये टी 20 क्रिकेटचा थरार रंगणार आहे. सीपीएल अर्थात कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 12 व्या पर्वाला आजपासून 29 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तर 6 ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे. सीपीएलच्या या 12 व्या हंगामात यंदा नव्याने 2 संघाचा समावेश करण्यात आला आहे. एटींग्वा आणि बारबुडा फाल्कन्स असं या दोन्ही संघांची नावं आहेत.

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 12 व्या पर्वातील सलामीच्या सामन्याला भारतीय वेळेनुसार (30 ऑगस्ट) पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तसेच ज्या दिवशी 2 सामने असतील, तेव्हा भारतात पहिल्या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होईल. तर दुसरा सामना हा पहाटे साडे चार वाजता सुरु होईल. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्व सामने भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे सामने पाहायला मिळतील.

सीपीएलच्या 12 व्या मोसमाचं वेळापत्रक

एंटीग्वा एंड बारबुडा फाल्कन्स : इमाद वसीम, ब्रँडन किंग, फॅबियन एलन, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), मोहम्मद आमिर, क्रिस ग्रीन, फखर जमान, रोशोन प्राइमस, जस्टिन ग्रीव्स, हेडन वॉल्श, जाहमार हेमिल्टन, टेडी बिशप, कोफी जेम्स, शमर स्प्रिंगर, केल्विन पिटमॅन, ज्वेल एंड्रयू आणि जोशुआ जेम्स.

बारबाडोस रॉयल्स – रोवमॅन पॉवेल, जेसन होल्डर, डेविड मिलर, क्विंटन डी कॉक, महेश तीक्षणा, अलिक अथानाजे, नवीन-उल-हक, ओबेद मॅककॉय, केविन विकम, केशव महाराज, कदीम एलेने, रहकीम कॉर्नवाल, इसाई थॉर्न, नाथन सीली, नईम यंग, रिवाल्डो क्लार्क आणि रेमन सिमंड्स।

गयाना अमेझॉन वॉरियर्स – इमरान ताहिर, शिमरन हेटमायर, सॅम अयूब, शाई होप, रोमारियो शेफर्ड, आजम खान, गुडाकेश मोती, रहमानुल्लाह गुरबाज, कीमो पॉल, ड्वेन प्रिटोरियस, केविन सिंक्लेयर, रेमन रीफर, रोनाल्डो अली मोहम्मद, शमर जोसेफ, केवलॉन एंडरसन, मॅथ्यू नंदू आणि जूनियर सिंक्लेयर.

सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स – कायल मेयर्स, रायली रुसो, एविन लुईस, शेरफेन रदरफोर्ड, सिकंदर रजा, एनरिक नॉर्टजे, आंद्रे फ्लेचर, ट्रिस्टन स्टब्स, डोमिनिक ड्रेक्स, मिकाइल लुइस, ओडियन स्मिथ, जोशुआ दा सिल्वा, वीरासॅमी पर्मॉल, रयान जॉन, एशमीड नेड, जोहान लेने आणि तबरेज शम्सी.

सेंट लूसिया किंग्स – टिम सायफर्ट, फाफ डु प्लेसिस, अल्जारी जोसेफ, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेस, नूर अहमद, डेविड विसे, भानुका राजपक्षे, मॅथ्यू फोर्ड, आरोन जोन्स, खारी पियरे, खारी कँपबेल, जोहान जेरेमिया, शैड्रॅक डेसकार्टे, मिकेल गोविया, मॅकेनी क्लार्क आणि अकीम ऑगस्टे.

ट्रिनबागो नाइट रायडर्स – किरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल, सुनील नरेन, निकोलस पूरन, टिम डेविड, अकील होसेन, जेसन रॉय, ड्वेन ब्रावो, जोश लिटिल, वकार सलामखेल, जायडन सील्स, अली खान, मार्क डेयाल, केसी कार्टी, टेरेंस हिंड्स, नाथन एडवर्ड आणि शॅकर पॅरिस.

खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.