Cricket : क्रिकेटमधील पाच वर्ल्ड रेकॉर्ड जे कधीच मोडले जाणार नाहीत, भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश!

क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नागी. सामना जिंकणार असताना बाजी पलटली जाते. त्यामुळे कोणता विक्रम कधी मोडला जाईल कोणी सांगू शकत नाही. परंतु क्रिकेटमधील टॉप 5 महाविक्रम जे तुटणं शक्य नाही. पाच वर्ल्ड विक्रम कोणते आहेत जाणून घ्या.

| Updated on: Aug 29, 2024 | 6:04 PM
1 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या नावावर एक मोठा विक्रम आहे. रोहिच्या आपल्या करियरमध्ये वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक करणारा तो एकमव खेळाडू आहे. रोहितने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध एक आणि श्रीलंकेविरूद्ध दोन द्विशतके केली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे.

2 / 5
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्या आपल्या करिययरमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. शंभर शतकांचा विक्रम सचिनने केला आहे. कसोटीमध्ये 51 आणि वन डे क्रिकेमधील 49 अशी एकूण त्याच्या नावावर 101 शतके आहेत. हा विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 18426 धावांचा विक्रम आहे, जो एक विश्वविक्रम आहे.

3 / 5
श्रीलंका संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने आपल्या करियरमध्ये एकूण 1347 विकेट घेतल्या आहेत. यामधील 133 कसोटीमध्ये  800 विकेट आणि 350 वन डे सामन्यांमध्ये 534 विकेट त्याने घेतल्या आहेत. मुरलीधरनचा हा विक्रम मोडण शक्य नाही.

4 / 5
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ब्रायन लारा सर्वांनाच महिती आहे.  लारा एकदी पिचवर टिकला बॉलर्स रडण्याचे बाकी राहत होते. ब्रायन लाराने  2004 मध्ये सेंट जॉन्स येथे इंग्लंडविरुद्ध वैयक्तिक 400 धावांची इनिंग खेळली होती. कसोटी क्रिकेटमध्ये अजुनही हा रेकॉर्ड कोणाला मोडता आलेला नाही.

5 / 5
दक्षिण आफ्रिका संघाचा मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. जो सहजासहज कोणालाही मोडता येणार नाही. ए बीने वन डे आंतरराष्ट्रीयमध्ये क्रिकेट अवघ्या 31 चेंडूत शतक ठोकलं आहे.  2015 मध्ये जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 44 चेंडूत 149 धावा केल्या होत्या.