AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकला, युझवेंद्र चहलने सांगितलं की…

क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकत्र असलेल्या सोफीसोबत सात फेरे घेतले आहे. यावेळी शिखर धवन आणि सोफीने परिधान केलेल्या पेहरावाची चर्चा होत आहे. क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने याबाबत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकला, युझवेंद्र चहलने सांगितलं की...
क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकला, युझवेंद्र चहलने सांगितलं की...Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Feb 21, 2026 | 8:29 PM
Share

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने पुन्हा एकदा नवी इनिंग सुरू केली आहे. यावेळी त्याने लेडी लव सोफीसोबत सात फेरे घेतले आहेत. गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर शिखर धवन आणि सोफीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं आहे. लग्नाच्या दिवशी शिखर धवन आणि सोफी व्हाइट आणि आयवरी थीमच्या आउटफीटमध्ये दिसले. दोघंही रॉयल कपल वाटत होते. शिखरने आपल्या लुकने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पांढऱ्या रंगाची एम्ब्रॉयडरी शेरवानी त्याने परिधान केली होती. तर डोक्यावर राजेशाही पगडी घातली होती. त्यामुळे त्याचा पेहराव एखाद्या राजकुमारासारखा वाटत होता. इतकंच काय तर गळ्यात पन्ना माळ घातली होती. त्यामुळे अधिक आकर्षक दिसत होता. दुसरीकडे, सोफीही एखाद्या परीसारखी दिसत होती. तिने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील आयवरी आणि ऑरेंज रंगाची 3डी फुलांनी सजलेला लहंगा परिधान केला होता. मोत्याने भरतकाम केलेला ब्लाउज, काउल टॅसल आणि जुळणारा हेड वेल सोबत होता.

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल देखील लग्नाला उपस्थित होता. शिखर धवन आणि सोफीच्या लग्नाची बातमी क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने स्वतः नाचत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. चहलने पोस्टमध्ये धवन आणि सोफीचे फोटो शेअर केले आहेत.  तसेच शिखर धवनसाठी एक खास संदेश देखील लिहिला. पोस्ट शेअर करताना चहलने लिहिले की, “माझ्या मित्राचे लग्न आहे.”

शिखर धवनचे हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी 2012 मध्ये त्याने 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आयेशा मुखर्जीसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2023 मध्ये दोघंही विभक्त झाले. या दोघांना एक मुलगा असून तो आयेशासोबत असतो. असं असताना शिखर धवनची सोफीसोबत मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सोफी ही आयर्लंडमध्ये राहणारी असून प्रोडक्य कंसल्टेंट आहे. तसेच शिखर धवनपेक्षा वयाने 5 वर्षे लहान आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा